मुंबई 31 ऑक्टोबर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्कवर दीपोत्सव साजरा केला. यावर्षीच्या दीपोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटनाला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही बोलावलं होतं. तेव्हापासून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे, बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप महायुतीची जोरदार चर्चा रंगली आहे. यावर आता राज ठाकरे यांनी स्वतःच प्रतिक्रिया दिली आहे. …अजून 24 तास बाकी, रवी राणांच्या दिलगिरीनंतर बच्चू कडू यांचे सूचक विधान महायुतीबाबतच्या चर्चांवर बोलताना राज ठाकरे म्हणाले, की दिपोत्सवाचं उद्घाटन होतं. त्यासाठी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बोलावलं होतं. या कार्यक्रमासाठी त्यांना बोलावलं तर गैर काय आहे? असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. यासोबतच पुढे ते म्हणाले, की मी जर कुठल्या कलाकाराला बोलावलं तर मग मी चित्रपट क्षेत्रात जाणार का? असं बोलत त्यांनी ही राजकीय भेट नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान वेदांता- फॉक्सकॉनपाठोपाठ नागपुरात साकारण्याचा प्रस्ताव असलेला टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही गुजरातला गेला आहे. यावरही राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे म्हणाले, की ‘माझं मत होतं की पंतप्रधान देशाचे आहेत.प्रत्येक राज्य त्यांना मुलाप्रमाणे असलं पाहिजे. जर प्रकल्प आसामला गेला असता तर मला बरं वाटलं असतं. पण जो तो प्रकल्प गुजरातला का जातो?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. फडणवीसांनी केली कानउघडणी, रवी राणा ‘गुवाहाटी’वरून नरमले, व्यक्त केली दिलगिरी! सध्याच्या राजकारणावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. सध्याचं राजकारण अतिशय खालच्या पातळीच आहे. राजकारण्यांची भाषाही खालच्या पातळीची असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. आपल्या कोकण दौऱ्याबाबतही राज ठाकरेंना यावेळी माहिती दिली. ‘27 नोव्हेंबरला पक्षाच्या गटाध्यक्षांचा मेळावा गोरेगावला होणार आहे.मेळावा झाला की 28 तारखेला मी कोकण दौऱ्याला जाणारा आहे. सोबतच कोल्हापूरला जाऊन देवीचं दर्शनही घेणार आहे,’ असं ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.