पुणे, 09 ऑगस्ट : कोरोनामुळे राज्यभर हाहाकार पसरला आहे. कोरोनासारख्या जीवघेण्या आजारामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहेत. या सगळ्यात अनेकांनी कोरोनाच्या भीतीमुळे आपला जीव संपवला आहे. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. राजगुरूनगरमध्ये ज्येष्ठ नागरिकाने स्वःताचा गळा कापून केली आत्महत्या केली आहे. कोरोना टेस्ट पुन्हा बाधित येणार म्हणून नैराश्यात येऊन आत्महत्या केली.
जिल्ह्यतील खेड तालुक्यातील राजगुरूनगर शहरात एक 60 वर्षीय जेष्ठ नागरिकाने गळ्यावर कापुन घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना राजगुरूनगर शहरात घडली आहे. दिनकर ज्ञानेश्वर जुन्नरकर असे या जेष्ठ नागरिकाचे नाव असुन ते शहराच्या बाजारपेठ परिसरात राहत होते.
टिप्पर आणि बाईकचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 3 जण जागीच ठार
मयत जुन्नरकर व त्यांच्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. दोघेही पुण्यातील खासगी रुग्णालयात 15 दिवस उपचार घेऊन चारच दिवसांपूर्वी घरी आले होते. मात्र, दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा होत नव्हती असे सांगितले जात आहे. एक कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यावर ते घरी राहून काळजी घेत होते. त्यांना याचा तीव्रतेने त्रास जाणवत होता.
SBI ने 42 कोटी ग्राहकांसाठी सुरू केली ATM मधून पैसे काढण्याची नवीन सुविधा
शुक्रवारी (दि 7) पुन्हा स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल आज येणार होता. पण त्यांना त्रास होत होता. त्रास कमी होत नसल्याने जुन्नरकर यांनी शुक्रवारी झोपल्यावर खोलीतील बाथरुममध्ये धारदार सुरीने व कात्रीने स्वःताचा गळा कापून आत्महत्या केली. सकाळी मुलगा त्यांना उठवायला गेल्यावर वडील बाथरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडल्याचे लक्षात आलं.
Good News: मुंबईजवळचं हे शहर होतंय कोरोनामुक्त, 10 दिवसांत वाढले फक्त 53 रुग्ण
शेजारीच चाकू आणि कात्री आढळून आली. तात्काळ त्यांना उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी जुन्नरकर यांना मूत्य घोषित केले. श्रीनाथ दिनकर जुन्नरकर यांनी या घटनेबाबत खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खेड पोलीस अधिक तपास करीत आहेत.