टिप्पर आणि बाईकचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 3 जण जागीच ठार

टिप्पर आणि बाईकचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 3 जण जागीच ठार

अंबेजोगाई तालुक्यातील काळवटी तांडा इथली ही घटना आहे. रात्री 10च्या सुमारास हा अपघात घडला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • Share this:

बीड, 09 ऑगस्ट : बीडमध्ये वाळू भरलेल्या टिप्परच्या धडकेत तीनजण ठार झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. अंबेजोगाई तालुक्यातील काळवटी तांडा इथली ही घटना आहे. रात्री 10च्या सुमारास हा अपघात घडला असल्याची माहिती देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचावकार्य करणारी टीम घटनास्थळी दाखल झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातामध्ये ठार झालेले तिघेजण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती देण्यात आली आहे. तिघेही जण बाईकने चालले असताना रात्रीच्या अंधारात टिप्पर चालकाला दिसलं नाही आणि बाईकशी जोरदार धडक झाली. या धडकेमध्ये बाईकवर असलेल्या तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

आदित्य ठाकरेंचे बॉलिवूडमध्ये अनेक मित्र, पण सुशांत प्रकरणात...;राऊतांचे थेट सवाल

नागनाथ महादेव गायके, वसंत जनार्धन गायके आणि विठ्ठल मुंजाजी गायके अशी मयत व्यक्तींची नावं आहेत. लॉकडाऊनमध्येदेखील अवैध वाळू तस्करी सुरू आहे. अवैध वाळू तस्करी करणाऱ्या टिप्परच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अवैध वाळू वाहतूक थांबवा अशी मागणी वारंवार समोर येत आहेत.

SBI ने 42 कोटी ग्राहकांसाठी सुरू केली ATM मधून पैसे काढण्याची नवीन सुविधा

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळावरून तीन मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर अपघाताचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 9, 2020, 9:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading