ठाणे, 9 ऑगस्ट : राज्यात कोरोनाने विळखा घातला आहे. अशात मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याने चिंता वाढली होती. पण आता मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ठाण्यात कोरोनाची सुरुवात ज्या मुंब्रा परिसरातून झाली त्या झोपडपट्टी परिसरातून कोरोनाचा धोका आणखी वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. पण आता याच परिसरातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 10 दिवसांमध्ये फक्त 53 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर या परिसरात शुक्रवारी एकही कोरोना रुग्ण समोर आला नाही. त्यामुळे इथे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. लॉकडाऊनचे काटेकोर नियम पाळल्याने इथे कोरोनाला आवर घालण्यात आली असं इथल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
पहिल्या कसोटीत इंग्लंडचा दणदणीत विजय, 2 वर्षानंतर पाकला चारली धूळ
मुंबई हे देशात कोरोना हॉटस्पॉट म्हणून ओळखलं जात आहे. राज्यातले सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत असल्याने सरकारची चिंता वाढली होती. मात्र आता मुंबईत कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण हे वाढलं असून ते तब्बल 87 दिवसांवर गेलं आहे. ही अत्यंत चांगली गोष्ट असल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केलंय. 10 जूनला हा रेट फक्त 25 एवढाच होता. मात्र महापालिका आणि राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे हा कालावधी वाढल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.
Air Crash: फक्त आठ दिवसांवर आलं होतं मुलाचं लग्न, आठवणीने आईने फोडला हंबरडा
महिनाभरातच हा रेट 25 वरून 87 एवढा झाल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे. याचा अर्थ नवे रुग्ण कमी प्रमाणात निघत असल्यांही म्हटलं जातं. धाराविमध्ये सुरुवातीला जास्त रुग्ण होते. मात्र मिशन धारावी राबविल्यामुळे ते प्रमाण कमालीचं कमी झालं आहे. त्यामुळे प्रशासनाची मोठी चिंता दूर झाली आहे. आता मोठ्या सोसायट्यांमध्ये रुग्णांचं प्रमाण वाढत आहे. तर अनेक नवे पॉकेट्स तयार होत असल्याने प्रशासनाचं सर्व लक्ष त्यावर केंद्रीत झालं आहे.