पुणे: PUBG गेममुळे तरुणाच्या डोक्यावर परिणाम, व्यक्तीचं नाव ऐकून विश्वास बसणार नाही!

पुणे: PUBG गेममुळे तरुणाच्या डोक्यावर परिणाम, व्यक्तीचं नाव ऐकून विश्वास बसणार नाही!

ज्या तरुणाच्या डोक्यावर पब्जीमुळे परिणाम झाला आहे त्याचं नाव ऐकल्यानंतर तुम्हाला विश्वासच बसणार नाही.

  • Share this:

रायचंद शिंदे, प्रतिनिधी

चाकण, 03 डिसेंबर : पब्जी या मोबाईल गेममुळे चाकण परिसरातील एका तरुणाच्या डोक्यावर परिणाम झाला असून उच्चशिक्षित असलेल्या या  तरुणाला नागरिकांनी चाकण पोलिसात पकडून दिलं आहे. या बातमीची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. ज्या तरुणाच्या डोक्यावर पब्जीमुळे परिणाम झाला आहे त्याचं नाव ऐकल्यानंतर तुम्हाला विश्वासच बसणार नाही. याच नावामुळे या बातमीची जोरदार चर्चा सुरू आहे.

अजित पवार असं या तरुणाचं नाव आहे. पब्जी गेम खेळून अजित पवारांच्या डोक्यावर परिणाम असं म्हटल्यावर आपल्याला नक्की आश्चर्य वाटेल. परंतु हे राजकारणातील नसून पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये सध्या वास्तव्यास असलेले उच्चशिक्षित तरुण आहेत. मूळचे इंदापूर तालुक्यातील टेंभुर्णी गावचे ते रहिवासी आहेत. या अजित शिवाजी पवार महाशयांचा राजकारणातील अजित दादांशी काहीही सबंध नसून यांचे फक्त नाम साधर्म्य आहे. चाकणमधील हा तरुण पब्जी गेमच्या आहारी गेल्याने पब्जी गेम सारखेच सामान्य आयुष्यात वागू लागले.

इतर बातम्या - धक्कादायक! मुंबईच्या बीचवर सुटकेसमध्ये सापडले हात आणि पायाचे तुकडे, मृतदेह कोणाचा?

सोमवारी सकाळी या महाशयांना पब्जी गेममध्ये पराभव स्वीकारावा लागल्याने गेममध्ये दिल्या जाणाऱ्या कमेंट्सचा वापर तरुणाने आपल्या सामान्य आयुष्यात केला. आज या तरूणाने चाकणच्या रस्त्यावरती जाऊन पब्जी गेममध्ये येणारे कमेंट्स नागरिकांना वापरल्या. त्यामुळे पब्जी गेमने त्याचे मनोधैर्य खचले असून ते आता मानसिक मनोरुग्ण झाले आहेत.

मोठी बातमी - पुणे हादरलं, घरात सापडला उच्चशिक्षित तरुणीचा मृतदेह

यावर चाकण पोलीस या तरुणाला नेमका कसा आधार देतात ते पाहावं लागणार आहे. देशात सध्या पब्जी, ब्लू वेल, ब्लॅक पँथर यांसारख्या गेममुळे अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागला असल्याने आता सरकारने पब्जी गेम वर्तीही काहीतरी निर्बंध घालण्याची गरज निर्माण झाली आहे. येत्या काळात केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशा गेम वरती काय निर्बंध घालतात हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.

इतर बातमी - अंत्यविधीत घडला धक्कादायक प्रकार, अर्धवट जळालेला मृतदेह कुत्र्याने नेला ओढून

Published by: Renuka Dhaybar
First published: December 3, 2019, 11:40 AM IST

ताज्या बातम्या