मुंबई, 03 डिसेंबर : सोमवरी संध्याकाळी मुंबई हादरवून सोडणारी एक घटना घडली आहे. मुंबईच्या माहिम बीचवर एका सुटकेसमध्ये शरीराचे तुकडे सापडले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. माहिम बीचवर फिरण्यासाठी गेलेल्या लोकांच्या ही बाब लक्षात आली आणि तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे. हे सुटकेस समुद्रातून वाहून आल्य़ाचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, हे सुटकेस उघडल्यानंतर त्यामध्ये उजवा पाय आणि डावा हाथ सापडला तर शरीराचे इतर भागही सुटकेमध्ये सापडले आहेत. नागरिकांनी गजबजलेल्या ठिकाणी असं मानवी शरीर कापून ठेवलेलं सुटकेस सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मोठी बातमी - पुणे हादरलं, घरात सापडला उच्चशिक्षित तरुणीचा मृतदेह पोलिसांनी हे सुटकेस ताब्यात घेतलं असून त्यातील मृतदेहाचे तुकडे शवविच्छेदनासाठी सायन नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, हा महिलेचा की पुरुषाचा मृतदेह आहे हे अद्याप समजू शकलं नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सापडलेल्या शरीराच्या तुकड्यांमध्ये संपूर्ण मृतदेह नसून त्यात शरीराचे अर्धेच भाग आहेत. त्यामुळे मच्छिमारांच्या मदतीने समुद्रात मृतदेहाचे इतर भाग शोधण्याचं काम सुरू आहे. इतर बातम्या - अंत्यविधीत घडला धक्कादायक प्रकार, अर्धवट जळालेला मृतदेह कुत्र्याने नेला ओढून सुटकेसमध्ये मानवी शरीराचे तुडके सापडल्यानंतर सगळ्या पोलीस स्थानकांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार, आलेल्या तक्रारींवर पोलीस लक्ष ठेऊन असणार आहेत. या घटनास्थळीच्या नजिकच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येणार आहेत. तर अधिक माहितीसाठी प्रत्यक्षदर्शींचीदेखील पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.