Home /News /news /

अंत्यविधीत घडला धक्कादायक प्रकार, अर्धवट जळालेला मृतदेह कुत्र्याने ओढून नेला आणि...

अंत्यविधीत घडला धक्कादायक प्रकार, अर्धवट जळालेला मृतदेह कुत्र्याने ओढून नेला आणि...

परिसरातील काही तरुणांनी कुत्र्यांना पळवलं आणि पुन्हा अर्धवट जळालेला मृतदेहाचा दहनविधी केला.

    अहमदनगर, 03 डिसेंबर : एखाद्या व्यक्तीचं निधन झालं की त्याच्या आत्म्यास शांती लाभो यासाठी त्यांच्यावर अंत्यविधी केले जातात. पण अहमदनगरमध्ये एक मन हेलावून टाकणारा प्रकार समोर आला आहे. मोकाट कुत्र्यांनी चितेतून मृतदेह ओढून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून महापालिकेच्या आरोग्यविभागाचा ढिसाळ कारभार यातून अधोरेखित होतो. अर्धवट जळालेला मृतदेह मोकाट कुत्र्यांनी चितेतून बाहेर काढत बर्‍याच अंतरावर ओढत नेल्याचा गंभीर प्रकार नगर मधील नालेगाव येथील अमरधाम स्मशानभूमीत उघडकीस आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर परिसरातील काही तरुणांनी कुत्र्यांना पळवलं आणि पुन्हा अर्धवट जळालेला मृतदेहाचा दहनविधी केला. अमरधाम स्मशानभूमीत रविवारी दिवसभरात सुमारे 13 ते 14 अंत्यविधी झाले. दहन ओट्यांची संख्या कमी असल्याने काही अंत्यविधी ओट्याच्या खाली करण्यात आले होते. रात्री उशिरा ही एक अंत्यविधी ओट्याच्या खालीच करण्यात आली होती.  काही नागरिक दशक्रिया विधी निमित्त अमरधाममध्ये आले असता त्यांना एक अर्धवट जळालेला मृतदेह मोकाट कुत्रे ओढत नेत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे तेथे उपस्थित नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलं आहे. या संपूर्ण प्रकराची माहिती महापालिका आणि पोलिसांना देण्यात असून परिसरात फिरणाऱ्या कुत्र्यांना ताब्यात घेण्याची विनंती नागरिकांकडून करण्यात आली. दरम्यान, या प्रकारामुळे परिसरात भीतीचं सावट आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Ahamadnagar

    पुढील बातम्या