वैभव सोनावणे, प्रतिनिधी
पुणे, 03 डिसेंबर : सिंहगरोड परिसरात माणिकबाग इथे घरातच एक तरुणी मृतावस्थेत आढळून आली आहे. तेजसा श्यामराव पायाळ (वय.26 वर्षे रा. फ्लॅट न.15) असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. ही घटना सोमवार दुपारी 2 ते 3 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी पंचशील नगर, पालवन रोड, बीड येथील मुळची राहणार आहे. तिचे शिक्षण एम.बी.ए झालं असून नोकरीच्या शोधासाठी इथे भाड्याने फ्लॅट घेऊन आई आणि दोन बहिणी समवेत वास्तव्यास होती. काही दिवसांपूर्वी हे सर्वजन बीड इथे गेले होते. मात्र, तीन दिवसांपूर्वी ही तरुणी एकटीच परत पुण्याला आली होती. तिच्या कुटुंबियांनी घातपाताची शक्यता वर्तवली असून शवविच्छेदनानंतर याबाबत गुन्हा दाखल केला जाईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
इतर बातम्या - अंत्यविधीत घडला धक्कादायक प्रकार, अर्धवट जळालेला मृतदेह कुत्र्याने नेला ओढून
सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत माधवबागेत 30 वर्षीय उच्चशिक्षीत मुलीचा राहात्या घरात मृतदेह मिळाला. धक्कादायक म्हणजे गळ्यावर दाबल्याच्या खुणा असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. घरात तीन ते चार दारूच्या बाटल्या आढळल्या. त्यामुळे या प्रकरणात मृत तरुणीच्या मित्र-मैत्रिणींची चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
घरात बेडवर तरुणीचा मृतदेह होता. तर घरातलं सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. त्यामुळे चोरीचा संशयदेखील पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी संपूर्ण घराची पाहणी केली असून संशयास्पद वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. त्यानुसार पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, या प्रकरणात मृत तरुणीच्या कुटुंबीयांची आणि तिच्या जवळच्या लोकांची चौकशी करण्यात येणार असून तिचे कॉल रेकॉर्डही पोलिसांनी मागवले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.