मुंबई: नोव्हेंबर महिना हा पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचा आणि तेवढाच धाकधूक वाढवणारा असतो. त्याचं कारण असं की लाईफ सर्टिफिकेट जमा केलं नाही तर पेन्शन मिळणार नाही. त्यामुळे पेन्शनसाठी बँक जाऊन काही खटपट करणं गरजेचं असतं. सतत बँकेच्या पायरा आता चढण्याची गरज नाही. बँकेतील लाईनमध्ये तासंतास उभं राहण्याची कटकटही नाही.
आता एका व्हिडीओ कॉलच्या मदतीने बँकेत लाईफ सर्टिफिकेट जमा करता येणार आहे. काही बँकांनी ही सुविधा सुरू केली आहे. 60 वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांना बँकेत कंपल्सरी लाईफ सर्टिफिकेट जमा करावं लागणार आहे. 31 नोव्हेंबरच्या आधी जर ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर पेन्शनचा लाभ घेता येणार नाही.
नोव्हेंबर महिना हा पेन्शन धारकांसाठी त्यामुळे सर्वात महत्त्वाचा मानला जातो. अशा परिस्थितीत देशभरातील कोट्यवधी पेन्शनधारकांना आपले जीवन प्रमाणपत्र अर्थात 'लाइफ सर्टिफिकेट' सादर करावे लागते. सुपर सिटिझन्स म्हणजेच ८० वर्षांवरील व्यक्तींना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा कालावधी मिळाला असल्याचे बँकांनी स्पष्ट केले होते. त्याचबरोबर 60 वर्षांवरील लोकांना 31 नोव्हेंबर 2022 पर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
पेन्शनवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, तुमच्या पगारावर कसा होणार परिणाम?
याआधी गेल्या वर्षी देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या पेन्शनर्सना व्हिडीओ कॉलद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा दिली होती. वय आणि आजारपणामुळे कुठेही हालचाल करण्याच्या स्थितीत नसलेल्यांसाठी ही सुविधा खूप फायदेशीर आहे. अशा परिस्थितीत तो व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून घरबसल्या डिजिटल पद्धतीने आपलं लाईफ सर्टिफिकेट सहज सोप्या पद्धतीने बँकेत जमा करता येऊ शकतं.
देशातील काही बँकांनी व्हिडीओ कॉलद्वारे लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याची मुभा दिली आहे. त्यापैकीच एक बँक म्हणजे बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना साध्या व्हिडिओ कॉलद्वारे त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा सुरू केली आहे. बँकेनं ट्विट करून माहिती दिली आहे.
गुडन्यूज! शून्य मिनिटांत काढा लाईफ सर्टिफिकेट, त्यासाठी काय करायचं? वाचा
बँक ऑफ बडोदानं ट्विट करत म्हटलं आहे की तुम्ही लाईफ सर्टिफिकेट जमा करण्यासाठी व्हिडीओ कॉलची मदत घेऊ शकता. घरबसल्या व्हिडीओ कॉलच्या मदतीने लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकता. तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर नेमकं काय प्रक्रिया तुम्हाला करावी लागणार आहे सोप्या शब्दात जाणून घ्या.
Ab Pension par full attention. Submit your life certificate at ease of home through a video call. To know more log on https://t.co/0mnyo6yJBE#BankofBaroda #AzadiKaAmritMahotsav @AmritMahotsav pic.twitter.com/M3mdGJjWHx
— Bank of Baroda (@bankofbaroda) October 31, 2022
व्हिडीओ कॉलद्वारे कसं जमा करायचं सर्टिफिकेट?
यासाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर Bankofbaroda.com क्लिक करा.
यानंतर ज्या पीपीओ नंबर आणि अकाउंट नंबरमधून तुमची पेन्शन येते तो नंबर भरा.
तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओटीपी येईल, तो अपलोड करा
आधार क्रमांक टाकून सबमिट बटन क्लिक करा
पुढे काही पर्याय निवडावे लागतील.
यानंतर कॉल नाऊ किंवा नंतरचा पर्याय निवडा.
यानंतर तुम्हाला बँकेकडून बोलावणं येईल आणि त्यानंतर बीओबी एजंट तुमच्यासमोर येईल.
यानंतर तुम्हाला तुमचा फोटो आयडी आणि अधिक माहिती भरावी लागेल.
यानंतर बेसच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर पुन्हा ओटीपी मिळेल, जो पुन्हा टाकावा.
यानंतर बँकेने आपले जीवन प्रमाणपत्र सादर करावे. मोबाईलवर मेसेज आणि मेलद्वारे तुम्हाला ही माहिती दिली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Pension, Pension funds, Pension scheme, Pensioners