मराठी बातम्या /बातम्या /मनी /गुडन्यूज! शून्य मिनिटांत काढा लाईफ सर्टिफिकेट, त्यासाठी काय करायचं? वाचा

गुडन्यूज! शून्य मिनिटांत काढा लाईफ सर्टिफिकेट, त्यासाठी काय करायचं? वाचा

गुडन्यूज! शून्य मिनिटांत काढा लाईफ सर्टिफिकेट, त्यासाठी काय करायचं? वाचा

गुडन्यूज! शून्य मिनिटांत काढा लाईफ सर्टिफिकेट, त्यासाठी काय करायचं? वाचा

व्हिडिओ लाईफ सर्टिफिकेट किंवा व्हीएलसी असं या नवीन फीचरचं नाव आहे. व्हीएलसीद्वारे, पेन्शनधारक घरी बसून व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्या बँकेत जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. हे प्रमाणपत्र एक वर्षासाठी वैध असेल. एसबीआयनं आपल्या लाखो पेन्शनधारकांच्या सोयीसाठी व्हीएलसी देखील सुरू केले

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 14 नोव्हेंबर: पेन्शन मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून सरकार नवीन सुविधा आणत आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईफ सर्टिफिकेट किंवा जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सोय. पूर्वीप्रमाणे आता पेन्शनधारकाला बँकेत जाऊन जीवन प्रमाणपत्र सादर करावं लागणार नाही. आता पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अनेक सुविधा मिळत आहेत. अशा सुविधा डिजिटल माध्यमातून उपलब्ध होत आहेत. यासाठी पेन्शनधारकाला बँकेत जाण्याची गरज नसून जीवन प्रमाणपत्र संगणकावर किंवा मोबाईलवरून घरी बसून सादर करता येईल.

व्हिडिओ लाईफ सर्टिफिकेट किंवा व्हीएलसी असं या नवीन फीचरचं नाव आहे. व्हीएलसीद्वारे, पेन्शनधारक घरी बसून व्हिडिओ कॉलद्वारे त्याच्या बँकेत जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतो. हे प्रमाणपत्र एक वर्षासाठी वैध असेल. आपल्या लाखो पेन्शनधारकांच्या सोयीसाठी एसबीआयनं व्हीएलसी सुरू केली आहे. यापूर्वी ही सेवा बँक ऑफ बडोदाने सुरू केली होती. यामध्ये पेन्शनधारक स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉल करू शकतो आणि जीवन प्रमाणपत्र सादर करु शकतो.

केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना वर्षातून एकदा पेन्शन जीवन प्रमाणपत्र सादर करावं लागतं. प्रमाणपत्र सादर न केल्यास पेन्शन थांबते. पेन्शनधारकांना स्वतः जावून जीवन प्रमाणपत्र जमा करावं लागते. पण VLC मध्ये अशी कोणतीही सक्ती नाही की पेन्शनधारकाला बँकेत किंवा एजन्सीमध्ये हजर राहावं लागेल. बँकेकडून पेन्शन घेणारा कोणताही निवृत्तीवेतनधारक त्याच्या शाखेत VLC द्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतो. हे काम SBI वेबसाइट किंवा SBI अॅपवरून करता येईल. जीवन प्रमाणपत्र कसं सादर करायचं ते जाणून घेऊया.

हेही वाचा: Children's Day: मुलांच्या नावावर करा 'ही' छोटीशी गुंतवणूक, कायमस्वरुपी मिटेल भविष्याचं टेन्शन

असं सादर करा जीवन प्रमाणपत्र-

  •  SBI च्या अधिकृत पेन्शनसेवा वेबसाइटला भेट द्या किंवा Pensionseva मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करा.
  • वेबसाइटवर वेबपृष्ठाच्या शीर्षस्थानी असलेल्या 'VideoLC' लिंकवर क्लिक करा. अॅप्लिकेशनमधील लँडिंग पेजवरून 'व्हिडिओ लाइफ सर्टिफिकेट' हा पर्याय निवडा.
  • ज्या खात्यात तुमची पेन्शन जमा होते तो खाते क्रमांक एंटर करा. नंतर कॅप्चा प्रविष्ट करा आणि तुमचा आधार तपशील वापरण्यासाठी बँक बॉक्स चेक करा.
  • 'व्हॅलिडेट अकाउंट' बटणावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल.
  • आवश्यक प्रमाणपत्रे सबमिट करा आणि कंटिन्यूवर क्लिक करा.

  • नवीन पेजवर तुमच्या सोयीनुसार व्हिडिओ कॉलसाठी अपॉइंटमेंट शेड्यूल करा. तुम्हाला एसएमएस आणि ईमेलद्वारे कन्फर्मेशन पाठवलं जाईल.
  • तुम्ही संमती दिल्यानंतर वेळापत्रकानुसार व्हिडिओ कॉलमध्ये सामील व्हा.
  • तुम्हाला बँक अधिकाऱ्यासोबत कॉलमध्ये व्हेरिफिकेशन कोड वाचावा लागेल आणि तुमचं पॅन कार्ड देखील दाखवावं लागेल.
  • पडताळणीनंतर कॅमेरा स्थिर ठेवा जेणेकरून बँक अधिकारी तुमचा चेहरा कॅप्चर करू शकतील.
  • सत्राच्या शेवटी एक संदेशाद्वारे तुमची माहिती भरल्याची पुष्टी केल्याची माहिती तुम्हाला मिळेल. व्हिडिओ लाइफ सर्टिफिकेटची स्थिती पेन्शनधारकांना एसएमएसद्वारे कळवली जाईल.

First published:
top videos

    Tags: Pension, Pensioners