मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /मराठा आरक्षणावरून ट्वीट करणाऱ्या चंद्रकांतदादांना जयंत पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर

मराठा आरक्षणावरून ट्वीट करणाऱ्या चंद्रकांतदादांना जयंत पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर

 राज्यपाल लवकरच यादीला मंजुरी देतील, असा विश्वास देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

राज्यपाल लवकरच यादीला मंजुरी देतील, असा विश्वास देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

राज्यपाल लवकरच यादीला मंजुरी देतील, असा विश्वास देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

रत्नागिरी, 7 नोव्हेंबर: घरात बसून चंद्रकांत पाटील (BJP Leader Chandrakant Patil) यांनी ट्वीट करून काय भूमिका व्यक्त केली, यावर मी प्रतिक्रिया व्यक्त करण्याची काही आवश्यकता आहे, असं वाटत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष तलेच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Minister Jayant Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

महाविकास आघाडीने मराठा तरुणांचा विश्वासघात करण्याचा प्रश्नच नाही. मराठा समाजाचं आरक्षण टिकावं यासाठी, आम्ही प्रयत्न करत असल्याचं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं. अर्णव गोस्वामी यांच्यावर कारवाई का झाली, याचा अभ्यास भाजपने केलेला दिसत नाही, असा टोला देखील जयंत पाटील यांनी लगावला. सावर्डे येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा...व्होरा समितीचा अहवाल प्रसिद्ध होताच उद्धव ठाकरे सरकार पडेल, भाजप नेत्याचा दावा

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीसाठी आमची शिफारस यादी राज्यपालांकडे (Maharastra Governor) दिली आहे. यावर पुढील 15 दिवसांत निर्णय घ्यावा, अशी विनंती राज्यपालांना सरकारनं केल्याची माहिती जयंत पाटील दिली आहे. राज्यपाल लवकरच यादीला मंजुरी देतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

सर्वांचीच इच्छा आम्ही पूर्ण करू शकत नाही..

आमदारकीसाठी अनेकजण इच्छूक होते. मात्र, सर्वांचीच इच्छा आम्ही पूर्ण करू शकत नाही, असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. ज्यांना संधी मिळाली नाही ते नाराज असणं स्वाभाविक आहे, पण त्यांची नाराजी आम्ही दूर करू, असं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं.

रक्षा खडसेंचं कौतुक...

राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार रक्षा खडसे यांच्या आंदोलनाच्या भूमिकेचं समर्थन केलं जात आहे. रक्षा खडसे या भारतीय जनता पक्षाच्या खासदार असल्या तरी जिल्ह्यातल्या केळी उत्पादकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने त्या भूमिका मांडत आहेत. त्यात वावगं ते काय?, असा सवाल जयंत पाटील यांनी त्यांच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) खेळखंडोबा करून मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. हा प्रकार राज्य सरकारला निश्चितच महागात पडणार, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर शरसंधान साधलं.

चंद्रकांत पाटील यांनी यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ट्वीट (Tweet)करत सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

राज्य सरकारने 2020-21 या शैक्षणिक वर्षातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे नोटिफिकेशन 4 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलं होतं. याशिवाय मराठा आरक्षण EWS अंतर्गत देण्याचं आश्वासनही दिलं होतं. मात्र, त्यांनी मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे. या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी SEBC प्रवर्गाचा साधा उल्लेखसुद्धा केला नाही. इतर आरक्षित असलेल्या सर्व प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे, ही अतिशय धक्कादायक बाब असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

अकरावी, इंजिनिअरिंग, मेडिकल अशा सर्वच प्रवेश प्रक्रिया रखडल्या आहेत. मराठा तरुणांचं भवितव्य अंधारमय होत चाललं आहे. मात्र, बिनकामी राज्य सरकारला याची किंचितसुद्धा पर्वा नाही. राज्य सरकारच्या या धोरणांमुळे यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही, हे सिद्ध होतं आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

हेही वाचा...मंत्रालयातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार, विधानसभा अध्यक्षांनी दिल्या सूचना

सत्तेचा माज सोडून तरुणांच्या भविष्याचा विचार करा..

राज्य सरकारने आतातरी सत्तेचा माज सोडून मराठा तरुणांच्या भविष्याचा विचार करा. अन्यथा मराठा रस्त्यावर उतरला की इतिहास घडतो, हे देशाने पाहिलं आहे, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

First published:
top videos

    Tags: Chandrakant patil, Jayant patil, NCP, Ratnagiri