जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मंत्रालयातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार, विधानसभा अध्यक्षांनी दिल्या सूचना

मंत्रालयातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार, विधानसभा अध्यक्षांनी दिल्या सूचना

मंत्रालयातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार, विधानसभा अध्यक्षांनी दिल्या सूचना

विधानभवनात मंत्रालयातील कक्ष अधिकारी पदावरील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती प्रलंबित असल्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 नोव्हेंबर : मंत्रालयातील अधिकारी संवर्गातील रिक्त पदे न्यायालयाच्या निर्देशानुसार व विहित कार्यपद्धतीने भरण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. कक्ष अधिकारी संवर्गाची ज्येष्ठता सूची जारी करुन या कामासाठी विशेष सेल तयार करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी, असंही त्यांनी सांगितलं. विधानभवनात मंत्रालयातील कक्ष अधिकारी पदावरील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती प्रलंबित असल्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव सु.मो.महाडिक, विधी व न्याय विभागाचे बु. झ.सय्यद, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार, गृहनिर्माण विभागाचे उपसचिव रा.को. धनावडे, उपसचिव टि.वा.करपते, वन विभागाचे अवर सचिव अ.म. शेट्ये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कक्ष अधिकारी विष्णू पाटील आदीसह संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. हेही वाचा- राज्य सरकारशी मतभेद, पोलीस महासंचालक जयस्वाल महाराष्ट्र सोडून केंद्रात जाण्याची शक्यता विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, तातडीने प्रशासनातील दोन्ही बाजू मांडून सेवा ज्येष्ठता यादी करून पुढील कार्यवाही करण्यास गती द्यावी. कक्ष अधिकारी पदाच्या 1986 पासूनच्या ज्येष्ठता सुधारित करण्याच्या कार्यवाहीस प्रदीर्घ कालावधी लागणार असून, या कामासाठी स्वतंत्र सेल तयार करण्यासंदर्भातील कार्यवाहीही करण्यात यावी, असेही नाना पटोले यांनी सांगितले. यावेळी मुख्य सचिव संजय कुमार यांनी विहित नियमांनुसार कार्यवाही करण्यात येईल असं सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress
  • First Published :
जाहिरात
जाहिरात