मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

व्होरा समितीचा अहवाल प्रसिद्ध होताच उद्धव ठाकरे सरकार पडेल, भाजप नेत्याचा दावा

व्होरा समितीचा अहवाल प्रसिद्ध होताच उद्धव ठाकरे सरकार पडेल, भाजप नेत्याचा दावा

 सत्ताधारी शिवसेना आणि विरोध पक्ष असलेल्या भाजपमध्ये जोरदार तूतू-मैमै सुरू आहे.

सत्ताधारी शिवसेना आणि विरोध पक्ष असलेल्या भाजपमध्ये जोरदार तूतू-मैमै सुरू आहे.

सत्ताधारी शिवसेना आणि विरोध पक्ष असलेल्या भाजपमध्ये जोरदार तूतू-मैमै सुरू आहे.

  • Published by:  Sandip Parolekar
नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर: महाराष्ट्रात शिवसेना (Maharashtra Shiv sena) पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray) यांच्या नेतृत्त्वात असलेल्या सरकारच्या भविष्याबाबत भाजप (BJP) नेत्यानं मोठा दावा केला आहे. माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या नेतृत्त्वात तत्कालीन सरकारनं स्थापन केलेल्या एनएन व्होरा (नरिंदर नाथ व्होरा) (NN Vohra Committee) समितीनं दिलेला अहवाल प्रसिध्द होताच महाराष्ट्रातील ठाकरे सरकार कोसळेल, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते अश्विनी उपाध्याय (Ashwini Upadhyay) यांनी केला आहे. एनएन व्होरा समितीचा अहवाल तात्काळ प्रसिद्ध करावा, अशी मागणी देखी अश्विनी उपाध्यय यांनी केली आहे. हेही वाचा......तर अख्खं मंत्रालय पेटवून देऊ, अखिल भारतीय मराठा महासंघाचा संतप्त इशारा दैनिक 'लोकमत'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि विरोध पक्ष असलेल्या भाजपमध्ये जोरदार तूतू-मैमै सुरू आहे. मात्र, एनएन व्होरा यांच्या नेतृत्त्वातील समितीनं 100 पानी अहवाल तयार केला होता. त्या अहवालामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसारख्या कुख्यात गुन्हेगाराशी देशातील राजकीय नेत्यांच्या आणि नोकरशहांच्या असलेल्या संबंधाबाबत खळबळजनक माहिती दडली आहे. मात्र, अद्याप या अहवालाची केवळ 12 पानंच प्रसिद्ध करण्यात आली आहे. उर्वरित अहवाल कधी प्रसिद्ध केला जाईल, असा सवाल अश्विनी उपाध्यय यांनी एक ट्वीट करून केला आहे. अश्विनी उपाध्यय यांनी म्हटलं आहे की, सुप्रीम कोर्टानं एनएन वोहरा समितीच्या अहवालावर कार्यवाही करण्याची सूचना केंद्र सरकारला केल्या होत्या. मात्र, तब्बल 23 वर्षे होत आली तरी केंद्र सरकारनं यासंदर्भात आतापर्यंत कोणतीही कार्यवाही केली नाही. तसेस अहवालाची उर्वरित पानं देखील सार्वजनिक केलेली नाहीत. अश्विनी उपाध्यय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पीएमओला टॅग करून ट्वीट केलं आहे. काय म्हटलं आहे अहवालात? मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव सरकारनं तत्कालीन गृहसचिव एनएन व्होरा यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीची स्थापना केली होती. या समितीमध्ये रॉ आणि आयबीचे सचिव, सीबीआयचे संचालक आणि गृहमंत्रालयातील सचिवांचाही समावेश होता. अनेक राजकीय नेते आणि बडे अधिकाऱ्यांचे गुन्हेगारी जगताशी संबंध असल्याचा दावा या समितीनं दिलेल्या अहवालात केला आहे. एवढंच नाही तर खळबळजनक माहितीही सरकारला दिली आहे. मात्र, 1995 मध्ये या अहवालाची केवळ 12 पानं प्रसिद्ध करण्यात आली होती. उर्वरित पानं अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाहीत. हेही वाचा...शिवसेनेच्या काळात ST महामंडळाची वाट लागली, काँग्रेसचे नेत्याचा सरकारला घरचा आहेर या अहवालात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसारख्या कुख्यात गुन्हेगाराशी देशातील राजकीय नेत्यांच्या आणि नोकरशहांच्या असलेल्या संबंधाबाबत खळबळजनक माहिती दडली आहे, असा दावा भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांनी केला आहे. अहवाल प्रसिद्ध होताच महाराष्ट्रातील सरकार पडेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
First published:

Tags: BJP, Shiv sena, Udhav thackeray

पुढील बातम्या