सिंधुदुर्ग, 08 सप्टेंबर : राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. शहरी भागासह आता ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला आहे. अपुऱ्या आरोग्य सेवेमुळे रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. सिंधुदुर्गात एका 52 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या मुलाने मन सुन्न करणारे पत्र लिहिले आहे.
अजिंक्य जाधव असं या तरुणाचं नाव आहे. चार दिवसांपूर्वी अजिंक्य जाधव यांच्या 52 वर्षीय आईचे कोरोनामुळे निधन झाले. 29 ऑगस्टला पहाटे 2 वाजता दम्याचा झटका आला होता. त्यानंतर रुग्णालयात दाखल करेपर्यंत कशा प्रकारे संकटांना तोंड द्यावे लागले, रुग्ण व्यवस्था कशी होती, याची व्यथाच अजिंक्य जाधव यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मांडली.
अजिंक्य जाधव यांचे पत्र जसेच्या तसे...
आईला दम्याचा झटका आल्यानंतर वैभववाडी सरकारी तालुका रुग्णालयात नेले. परंतु, ऑक्सिजनची व्यवस्था नाही म्हणून कणकवलीला स्वतःच्याच गाडीने हलवले. कणकवलीत तीचे शरीर ऑक्सिजन घेईना. व्हेंटीलेटरची गरज होती म्हणून मग पाच वाजता ओरोसला नेले जिल्हा रुग्णालयात तिथे ती थोडी स्थिर झाली. पण तिला थेट covid सेंटरला भरती केले आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तिच्यात तेवढी तीव्र लक्षण नव्हती. तिला 10 दिवसांआधी एकदा ताप येऊन गेला. पण नंतर तिला तितका काही त्रास झाला नाही आणि ती बरी होती. आजूबाजूला कोणताही कोरोनाबाधित रुग्णही नव्हता. ती घरातच होती. तरी तिला कोरोना झाला.
कंगनासाठी गुंडांचा उच्छाद, हिमाचल प्रदेशमधून गृहमंत्र्यांना फोन करून दिली धमकी
दुसऱ्या दिवशी तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर मग तिला कोविडची ट्रीटमेंट चालू झाली आणि ती ट्रीटमेंट चालू व्हायच्या आधी तिला एका तासाला 1 सिलेंडर लागत होते. पण कोविड उपचारानंतर ती बरीच स्थिर झाली. दुसऱ्या दिवशी तिला icu मध्येच हलवले. तिची जवळ जवळ 60% तब्येत सुधारली होती. पण तिला ज्या सेक्शनमध्ये नेले त्यात परत 30-35 पेशंट हे हाय रिस्क पेशंट होते. बरेच वेड लागलेले होते. कोरोना व्हायरसने ते मरत ही होते. ते बघून ती घाबरली की, काय झाले? आम्हाला माहीत नाही.
आयसीयू सेक्शन हा इतर लोकांसाठी धोकादायक असल्या कारणाने इतरांना जाऊ देत नाहीत. पण रात्री जेंव्हा ती गेली तेव्हा तिच्या ऑक्सिजन सिलेंडरचा काटा हा zero वर होता. (मी प्रशासनाला दोष देऊ इच्छित नाही. पण तो सिलेंडर बदलला असता वेळीच तर ती असती. पण महामारी आहे सर्वांचीच घाई होती. तेवढा समजूतदारपणा मी मनावर दगड ठेवून दाखवतो).अवघ्या दोन दिवसांत ती गेली.
पोलिसांच्या गाडीत घुसून बकरीनं खाल्ले महत्त्वाचे कागपत्र
आता तिची लक्षण समजली नाहीत. आम्हाला आम्ही त्या आदल्या दिवशी दमाच समजत होतो. पण या सगळ्यात एक गोष्ट मला प्रकर्षाने दिसली आपली आरोग्य यंत्रणा जिल्हा, तालुका गाव ही खूप कठीण परिस्थितीत आहे. तिचा वेग खूप मंद आहे. हा कोरोना वैभववाडीत लोकं म्हणतात 10 दिवस आधी आला. पण माझं मत आहे. तो महिनाभर आधी वैभववाडीत आहे.शिरकाव झाला आहे. वैद्यकीय अधिकरी तितके तत्पर नाहीत, गांभीर्य नाही.
सत्ताधारी विरोधक सर्व एकमेकांची उणीधुनी काढत आहेत. आपण चाकरमाण्यांना बोलवलं. राजकारण तापवलं. पण आपली आरोग्य व्यवस्था तितकी तत्पर आहे का? सोय आहे का? ताकद आहे का आपली? या प्रश्नांवर विचार करण्याची गरज आहे. जिल्हा तालुका आरोग्य व्यवस्थेची 3 -13 वाजलेले आहेत. जगावर संकट आहे.
तरी आम्ही कोरोनाकडे फक्त राजकारण म्हणून पाहिले. जिल्हा आरोग्य यंत्रणा खिळखिळी आहे. त्याची राजकारण्यांनी लाज बाळगावी आणि मग कोणता तो निर्णय घ्यावा. माझी विनंती आहे लोकप्रतिनिधींना एकत्र येऊन काम करा plan करा, नुसत्या टेस्टवर अवलंबून राहू नका. त्याचे रिपोर्ट पाच दिवसांनी येतात. त्यामुळे लोकं घाबरलेली आहेत.
सरकारी आरोग्य अधिकरी आणि खाजगी डॉक्टर यांना एकत्र आणा. वैभववाडीत गेल्या 25 दिवसांत तापाचे पेशंट वाढले होते. पण डॉक्टरांच्या गोळ्यांनी बरे झाले. माझा स्वतःचा अंदाज आहे. तो कोरोनाच होता. टेस्ट करून जो पॉझिटिव्ह भेटतो तीच रुग्ण संख्या ह्या भ्रमातून प्रशासनाने बाहेर यावे. खूप कठीण होईल ही परिस्थिती.
मोठा झटका! ऑक्सफोर्ड लशीची चाचणी थांबली
आता हे कमी आहे तोवर थांबवा. नाहीतर पुढे आणीबाणी येईल. हायरिस्क ला आपल्याकडे व्यवस्था कमी आहे. माझ्या अनुभवावरून सांगतो. virus बॉडीमध्ये असेल तर मानसिक संतुलन बिघडते. शेवटच्या स्टेजला वेड्याचे झटके येतात म्हणून आता गांभीर्याने घ्यावे लागेल. मी आणि वडील देखील पॉझिटिव्ह आहोत.
पण आम्ही आईच्या टेस्ट नंतर सायन हॉस्पिटलचा कोर्स चालू केला डॉक्टर मित्रा तर्फे घेतला आता आम्ही बरे आहोत ताप नाही आता आणि बाकी पण नाही काही. जिल्ह्यात रुग्णांचे हाल होत आहेत, जे झाले ते झाले.
पण वेळ हातात आहे. परिस्थिती व्यवस्थितीत करू शकतो. लोकांच्या मनात विश्वास निर्माण करा. खूप तळगाळातून एकत्र यावे लागेल. लोकांमध्येच जागृती करावी लागेल. प्रोटीनबद्दल सर्व समजवावे लागेल.आई सर्व करत होती वाफ, काढा पित होती. तरी ही वेळ आमच्यावर आलीच. तरी आता जिल्ह्याने सावध व्हावे ही विनंती आहे.सर्वांना.