मोठा झटका! ऑक्सफोर्ड लशीची चाचणी थांबली, Vaccine दिलेल्या रुग्णाची अशी झाली अवस्था

अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी एक निवेदन जारी केले आहे, यात त्यांनी रुटीन म्हणून ट्रायल थांबवले असल्याचे सांगितले.

अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी एक निवेदन जारी केले आहे, यात त्यांनी रुटीन म्हणून ट्रायल थांबवले असल्याचे सांगितले.

  • Share this:
    लंडन, 09 सप्टेंबर : कोरोनाव्हायरस (Coronavirus) विरूद्ध सुरू असलेल्या लढ्याला मोठा झटका बसला आहे. अ‍ॅस्ट्रॅजेनेका (AstraZeneca) आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी लशीच्या (Oxford covid-19 Vaccine) मानवी चाचणीत सामील झालेली व्यक्ती आजारी पडल्यानंतर ट्रायल थांबवण्यात आले आहे. अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी एक निवेदन जारी केले आहे, यात त्यांनी रुटीन म्हणून ट्रायल थांबवले असल्याचे सांगितले. चाचणीत सामील झालेल्या व्यक्तीच्या आजाराबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही आहे. या लसीला AZD1222 असे नाव देण्यात आले होते. जागतिक आरोग्य संघटनेनेच्या मते, जगातील इतर लशींच्या चाचण्यांमध्ये ऑक्सफर्डची लस आघाडीवर होते. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लशीकडे भारतासह अनेक देशांचे लक्ष लागून आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की ऑक्सफोर्डची लस ही बाजारात येणारी पहिली लस असेल. वाचा-भाजप सरकारचा मोठा निर्णय; या राज्यात आता मोफत होणार कोरोनाची टेस्ट वाचा-हिवाळ्यातील कपडे करू शकतात कोरोनापासून बचाव; तज्ज्ञांचा दावा AFPच्या वृत्तानुसार सध्या सुरू असलेली चाचणी जगभर थांबविण्यात आली आहे आणि स्वतंत्र तपासणीनंतरच ती पुन्हा सुरू होऊ शकते. लशीच्या तिसऱ्या टप्प्यात हजारो लोक सामील आहेत आणि बर्‍याचदा यासाठी अनेक वर्षे लागतात. कोरोना लशीच्या या तिसर्‍या टप्प्यात अंदाजे 30 हजार लोकांचा समावेश आहे. वाचा-लहान मुलांमध्ये दिसला कोरोनाचा धोकादायक सिंड्रोम MIS-C, ही आहेत लक्षणं ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रवक्त्याने सांगितले की, "अशा मोठ्या चाचण्यांमध्ये व्हॉलेंटिअर आजारी पडण्याची शक्यता असते, मात्र काळजीपूर्वक तपासणी करण्यासाठी स्वतंत्र तपासणी करणे फार महत्वाचे आहे". मुख्य म्हणजे ऑक्सफोर्ड कोरोना व्हायरस लसीची चाचणी थांबविण्याची ही दुसरी वेळ आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published: