पोलिसांच्या गाडीत घुसून बकरीनं खाल्ले महत्त्वाचे कागपत्र, पुढे काय झालं पाहा VIDEO

पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीत बकरीनं उडी मारून महत्त्वाचे कागदपत्र खाल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीत बकरीनं उडी मारून महत्त्वाचे कागदपत्र खाल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:
    जॉर्जिया, 09 सप्टेंबर : बकरी म्हटलं की मिळेल ते खात सुटते अशी म्हणायची पद्धत आहे. खरंच असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीत बकरीनं उडी मारून महत्त्वाचे कागदपत्र खाल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील एका पोलिस अधिकाऱ्याला जेव्हा त्याने आपली गाडी उघडली तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले आणि गाडीत बसलेला एक बकरी दिसली. इतकच नाही तर या बकरीनं काही महत्त्वाची कागदपत्रही खात होती. या अधिकाऱ्यानं बकरीला खाली उतरवण्याचे खूप प्रयत्न केले मात्र बकरी काही ऐकायला तयार नव्हती. हे वाचा-अंदाज चुकला अन् व्यापारी लिफ्टखाली चिरडला, मुंबईतील धक्कादायक घटना या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पोलीस अधिकारी जेव्हा गाडीतून बाहेर पडला आणि दवाजा पूर्ण बंद झाला नाही. त्यामुळे बकरी आतामध्ये शिरली आणि पेपर खायला लागली. या बकरीला काढण्याचा प्रयत्न केला मात्र ती बाहेर येण्यास तयार नव्हती. हा व्हिडीओ 4 सप्टेंबरला फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published: