जन्मदात्या आईनेच पोटच्या चिमुरड्याला बुडवलं पाण्याच्या टाकीत , नंतर रचलं असं कुभांड!

जन्मदात्या आईनेच पोटच्या चिमुरड्याला बुडवलं पाण्याच्या टाकीत , नंतर रचलं असं कुभांड!

पती-पत्नीच्या भांडणाने एका चिमुड्याचा बळी घेतला आहे. जन्मदात्या आईनेच तिच्या 4 वर्षाच्या चिमुरड्याला पाण्याच्या टाकीत बुडवून ठार मारले. नंतर स्वत:च्या हाताची नस कापून रचलं खोटं कथानक रचलं.

  • Share this:

चिडावा/झुंझुनूं,1 मार्च:पती-पत्नीच्या भांडणाने एका चिमुड्याचा बळी घेतला आहे. जन्मदात्या आईनेच तिच्या 4 वर्षाच्या चिमुरड्याला पाण्याच्या टाकीत बुडवून ठार मारले. नंतर स्वत:च्या हाताची नस कापून रचलं खोटं कथानक रचलं. राजस्थानातील बुडानिया येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.

पती विद्याधर स्वामी पत्नी सुनिता हिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. सुनिता हिने संतापाच्या भरात रात्री आपला मुलगा विवान याला पाण्याच्या टाकीत बुडवून त्याची निर्घृण हत्या केली. नंतर तिच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याचा बनाव केला. यासाठी सुनिताने स्वत:च्या हाताच्या आणि गळ्याच्या नस कापल्या. एवढेच नाही तर तिने नातेवाईकांना सांगितले की, हल्लेखोरांनी विवान याचे अपहरण केलं आहे. मात्र, नंतर विवानचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडल्याने सुनिताचं पितळ उघडं पडलं.

हेही वाचा....पत्नी पळून गेली प्रियकरासोबत, तिला शोधण्यासाठी पतीने केलं भयकंर कृत्य!

पती गेला होता लग्नाला..

ही घटना घडली तेव्हा सुनिताचा पती विद्याधर स्वामी एका विवाह सोहळ्यात गेला होता. या घटनेची माहिती मिळताच तो घरी पोहोचला. अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून विवान याचे अपहरण करून आपल्यावर हल्ला केल्याचे सुनिताने विद्याधरला सांगितले. त्यानेही तिच्यावर विश्वास ठेवला. मात्र, पोलिसांचे शॉन सुनिताच्या खोलीतील पाण्याच्या टाकीजवळच जात होते. एवढेच नाही तर पोलिसांना पलंगाखाली रक्ताने माखलेले ब्लेड सापडले. यावरून पोलिसांना संशय आला. पोलिसी खाक्या दाखवताच सुनिताने विवानची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी पाण्याच्या टाकीतून विवानचा मृतदेह बाहेर काढला.

हेही वाचा...'महाविकास आघाडी की दीवार नहीं टूटेगी', मुंबईतील कार्यक्रमात अजित पवारांची तुफान फटकेबाजी

चरित्र्यावर कायम संशय करत होता पती...

सुनिताने पोलिसांना सांगितले की, तिचा पती तिच्या चारित्र्यावर कायम संशय घेत होता. याच कारणावरून दोघांमध्ये दररोज भांडणही व्हायची. याच भांडणाला कंटाळून तिने मुलगा विवान याची हत्या केली. एसपी जगदीशचंद्र शर्मा यांनी सांगितले की, सुनिताला मुलाची हत्या केल्याप्रकरणी अटक केली आहे. तसेच तिचा पती विद्याधर स्वामीची चौकशी करण्यात येणार आहे. तो सुनिताच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचे सिद्ध होताच त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल.

हेही वाचा..दिल्ली हिंसाचार : चिमुकलीच्या बोबड्या बोलांनी तरी दिल्ली शांत होईल? पाहा VIDEO

First published: March 1, 2020, 5:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading