चंद्रकांत बनकर,(प्रतिनिधी)खेड(रत्नागिरी),29 फेब्रुवारी: पत्नीच्या विरहाने काही जण वेडे झालेले आपण पाहिले असतील, काही जण स्वतः ला शारीरिक आणि मानसिक नुकसान करताना पाहिले किंवा ऐकलं असेल. मात्र, पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली म्हणून तिचा शोध घेण्यासाठी पतीने चक्क दुचाकी आणि महेंद्रा पिकअप चोरल्याची धक्कादायक महिती समोर आली आहे. आरोपीने पत्नी आणि तिच्या प्रियकराला शोधण्यासाठी महाड आणि दापोली या दोन शहरातून दुचाकी आणि चार चाकी गाड्या चोरून तो गुन्हेगार बनला. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर ही माहिती उजेडात आली आहे.
महाड येथून दुचाकी आणि दापोली येथून महेंद्रा पिकअप गाडी चोरल्यानंतर आरोपी खेडमध्ये आणखी एक गाडी चोरण्याच्या तयारीने आला होता. पोलिसांना सापळा रचून आरोपी आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. चोरीच्या हेतूने संशयास्पद फिरताना खेड येथील भरणे नाक्याजवळ पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी शु्क्रवारी पहाटे 2 वाजता दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता पत्नीच्या शोधासाठी हे नवरोबा चक्क चोऱ्या करत फिरत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी चोरलेल्या सर्व गाड्या ताब्यात घेऊन महाड आणि दापोली तालुक्यातील उम्बर्ले येथील चोऱ्या उघडकीस आणल्या आहेत.
हेही वाचा..पुन्हा तेच! फाशीच्या 3 दिवस आधी निर्भयाच्या गुन्हेगाराने दाखल केली आणखी एक दया याचिका
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल रमेश पवार (रा.व्हाळन, भवानी नगर (ता.महाड, जि.रायगड) याची पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. तिला शोधण्यासाठी वेडापिसा झालेल्या राहुल पवार याने 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी महाड येथील शिवाजी चौक परिसरातून हिरो होंडा स्प्लेंडर (एमएच.12.सीपी. 7136) चोरली. नंतर तो उम्बर्ले (ता.दापोली) येथे आला. थंडीचा खूप त्रास होत असल्याने चोरलेली दुचाकी त्याच ठिकाणी ठेऊन उम्बर्ले येथील महेंद्र बोलेरो पिकअप (एमएच .08.डब्ल्यू . 1244) या गाडीची 12 फेब्रुवारी रोजी चोरी केली, त्यानंतर 28 फेब्रुवारी रोजी चोरी केलेल्या बोलेरो पिकअप गाडीचा मुंबई-गोवा महामार्गावर बोरज या ठिकाणी अपघात केला. या अपघातात गाडीचे प्रचंड नुकसान झाले.
हेही वाचा...आणखी एक हिंगणघाट! प्रेमाला नकार दिला म्हणून 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून जिवंत जाळलं
गाडी तिथेच सोडून महाड येथे जाण्यासाठी पुन्हा खेडमधील भरणे नाका परिसरात गाडी चोरण्याचा हेतूने तो आणि त्याचा मित्र सचिन शांताराम आलिम (वय-35, रा. अलीम वाडी, गुहागर) आला. 28 फेब्रुवारीला पहाटे 2 वाजता संशयास्पद फिरत असताना रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्यांना पकडले त्यांची विचारपूस केली असता, त्यांच्या बोलण्यावरून पोलिसांना संशय आला. त्यांना पोलिस स्टेशनमध्ये आणून त्यांची कसून चौकशी केली असता पत्नीच्या विरहाने चोर बनलेल्या नवरोबाची कहाणी उघड झाली. महाड आणि दापोली येथे राहुल पवार आणि सचिन आलिम यांच्यावर भादंवि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा..चोरट्यांनी पळवले चक्क ATM मशीन, अवध्या तीन मिनिटांत काम फत्ते, Video आला समोर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.