दिल्ली हिंसाचार : चिमुकलीच्या बोबड्या बोलांनी तरी दिल्ली शांत होईल? पाहा VIDEO

दिल्ली हिंसाचार : चिमुकलीच्या बोबड्या बोलांनी तरी दिल्ली शांत होईल? पाहा VIDEO

दिल्ली हिंसाचारात अनेकांना प्राण गमवावे लागले तर अनेकांची घरं जळाली आहेत. एका चिमुरडीचा एक व्हिडीओ या दंगलीदरम्यान व्हायरल झाला आहे. यामध्ये ही मुलगी शांतता राखण्याचं आवाहन करत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 मार्च :  देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये हिंसाचारामुळे (Delhi Violence) वातावरण पेटलं होतं. अनेकांना प्राण गमवावे लागले तर अनेकांची घरं जळाली आहेत. एका चिमुरडीचा एक व्हिडीओ या दंगलीदरम्यान व्हायरल झाला आहे. यामध्ये ही मुलगी शांतता राखण्याचं आवाहन करत आहे. ‘आम्हाला शाळेत शिकवलं जातं की भांडण करणं चुकीचं आहे, मग तुम्ही का भांडत असता? असं थोडी ना असत?’. असा गोड प्रश्न अनेकांना अनुत्तरित करणार आहे. 2 मिनिटाच्या या व्हिडीओमध्ये ही चिमुरडी शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन करत आहे. त्याचप्रमाणे सर्व काही पूर्ववत होण्यासाठी तिने अल्लाहकडे प्रार्थना देखील केली आहे.

‘तुम्ही जर भांडण करत असाल, तर आम्हालाही वाईट वाटेल. मी कुण्या एकाला सांगत नाही आहे, तर सर्वांनाच याबाबत सांगत आहे. जर एखाद्याला जरी माझं म्हणणं पटलं तर कृपया ते तुम्ही इतरांना समजवा. ज्यांची घरं जळाली आहेत त्यांना अल्लाहने मदत करावी अशी प्रार्थना या मुलीने केली आहे.

CAA समर्थक आणि विरोधकांच्या आंदोलनांमुळे उफाळलेल्या दंगलीमुळे दिल्लीचं मोठं नुकसान झालं. ईशान्य दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागात शनिवारी परिस्थिती शांत होती. या भागात हळूहळू जीवन पूर्वपदावर येत आहे. दुकानांतून किराणा सामान आणि औषधं खरेदी करण्यासाठी लोकं घराबाहेर पडताना दिसत आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला या भागातील हिंसाचारामुळे झालेल्या नुकसानीपासून स्थानिक रहिवासी हळूहळू सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. जाफराबाद,मौजपूर,बाबरपूर,चांदबाग,मुस्तफाबाद,भजनपुरा,शिव विहार,यमुना विहार या पूर्वोत्तर दिल्लीतील भागात मोठ्या प्रमाणात हिंसा झाली. या हिंसाचारात 42 लोकांचा मृत्यू आणि 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हिंसाचारात मालमत्तेचे बरेच नुकसान झाले आहे. संतप्त जमावाने घरं,दुकानं, वाहनं, पेट्रोल पंप यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. संतप्त जमावाकडून स्थानिकांवर आणि पोलिसांवर दगडफेक झाली.

 

First published: March 1, 2020, 5:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading