Home /News /mumbai /

'महाविकास आघाडी की दीवार नहीं टूटेगी', मुंबईतील कार्यक्रमात अजित पवारांची तुफान फटकेबाजी

'महाविकास आघाडी की दीवार नहीं टूटेगी', मुंबईतील कार्यक्रमात अजित पवारांची तुफान फटकेबाजी

अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सरकार पाच वर्षाची टर्म पूर्ण करेल, असा विश्वास दिला आहे.

मुंबई, 1 मार्च : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ऐतिहासिक आघाडी करत राज्यात अनोखा प्रयोग केला. या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. मात्र राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत जात केलेला शपथविधी आणि काँग्रेस-शिवसेनेतील वैचारिक मतभेद यामुळे हे सरकार कधीही पडू शकतं, अशी चर्चा असते. मात्र आज स्वःत अजित पवार यांनीच मुंबईतील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात याबाबत भाष्य केलं आहे. 'महाविकास आघाडी सरकारची दीवार कधी तुटणार? अशी चर्चा असते. पण महाविकास आघाडी की दीवार तुटेंगी नही. अंबुजा, एसीसी, इतकेच नव्हे तर सर्व सिमेंट कंपनी वापरून हे महाविकास आघाडीची दीवार झाली आहे, ती तुटणार नाही,' असं गमतीशीर भाष्य आपल्या खास शैलीत करत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सरकार पाच वर्षाची टर्म पूर्ण करेल, असा विश्वास दिला आहे. राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर बरसले अजित पवार गेली पाच वर्षात सत्ता नव्हती तेव्हाच्या कार्यकर्त्यांच्या तुलनेत आजच्या मेळाव्यात संख्या वाढली. सत्ता आल्यावर हे होते असते, असं सांगत अजित पवार यांनी जे पक्ष सोडून गेले त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अजित पवार म्हटले की, 'राष्ट्रवादीचे माजी चार मुंबई अध्यक्ष पक्ष सोडून गेले. जे गेले सचिन अहिर, चित्रा वाघ, संजय पाटील आणि प्रसाद लाड, एक मायचा लाल थांबला नाही, सगळे गेले. असली माणसे आता नको. सत्ता नसली तरी जो राहिला त्याला मदत करा.' 'सि्दधीविनायक ट्रस्टचे सुभाष मयेकर जो पर्यंत अध्यक्ष होता तो पर्यंत आपल्या सोबत आणि आता सत्ता गेल्यावर लगेच गेला, असले एक पण आता नको. आता महामंडळ नियुक्ती आहे. यावेळेस जो पक्षासमवेत असेल त्यालाच संधी द्यायची, जो खरा आपल्या सोबत राहिला त्यालाच मदत करायची,' असं रोखठोक मत अजित पवार यांनी व्यक्त केले. 'मिशन 2022' हा राष्ट्रवादीचा कार्यक्रम शिवसेना आणि काँग्रेस पक्षाला धक्का देण्यासाठी आहे, असा चुकीचा प्रचार मुद्दाम केला जात आहे. पण राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याचा प्रयत्न आम्हाला करायचा आहे,' असं अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी पक्षाने मुंबई आणि ठाण्यातील जागा वाढवल्या तर राज्यातील राजकारण वेगळे राहील, असंही ते म्हणाले. मुंबई महापालिकेत आता एक नंबरवर शिवसेना आहे. तो मित्र पक्ष आहे त्यामुळे तो एक नंबरवर राहू द्या. पण दुसरा नंबरचा पक्ष राष्ट्रवादी झाला पाहिजे, असं अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Ajit pawar, NCP

पुढील बातम्या