Home /News /news /

MLC Election Results 2020: नागपुरात भाजपला जबर धक्का, फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा झेंडा

MLC Election Results 2020: नागपुरात भाजपला जबर धक्का, फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा झेंडा

भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा झेंडा फडकला

    नागपूर, 4 डिसेंबर: नागपूर (Nagpur) पदवीधर निवडणुकीत भाजपला जबर धक्का बसला आहे. भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी भाजपचे संदीप जोशी यांचा पराभव केला आहे. अभिजित वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. त्यांनी ही आघाडी अंतिम फेरीपर्यंत कायम ठेवली आणि जोरदार मुसंडी मारत भाजपच्या गडाला मोठं खिंडार पाडलं. भाजपचे संदीप जोशी यांच्या मोठ्या मताधिक्यानं पराभव केला. हेही वाचा...पुण्यात भाजपचा गड ढासळला, महाविकास आघाडीचे अरुण लाड यांचा दणदणीत विजय  अभिजित वंजारी यांना एकूण 55 हजार 947, संदीप जोशी यांना 41 हजार 540, अतुल कुमार खोब्रागडे यांना 8 हजार 499 तर निलेश कराळे यांना 6 हजार 889 मते मिळाली. त्यानुसार अभिजित वंजारी यांना विजयी घोषित करण्यात आलं. नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीमध्ये मतमोजणीच्या पाचव्या फेरीअखेर 1 लाख 33 हजार 53 मतांची मोजणी पूर्ण झाली. पसंतीच्या या निवडणुकीमध्ये 60 हजार 747 मतांचा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नाही. अभिजीत वंजारी यांनी 14,407 मते संदीप जोशी यांच्यापेक्षा जास्त घेतली होती. मात्र विजयी होण्यासाठी आवश्यक असणारा मतांचा कोटा पूर्ण करू शकले नाही. त्यामुळं दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीला पहाटे सुरुवात करण्यात आली आहे. पाचव्या फेरीअखेर एकूण 1 लाख 33 हजार 53 मतांपैकी 11 हजार 560 अवैध व 1 लाख 21 हजार 493 मते वैध ठरली. दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी रात्रीपासूनचं जल्लोष सुरु केला आहे. दरम्यान, दुसरीकडे पुण्यातही भाजपचा गड ढासळला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांची पराभव करत 48 हजार 824 हजारांच्या मताधिक्यानी दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीचे अरुण लाड यांना एकूण 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली तर भाजपचे संग्राम देशमुख यांना 73 हजार 321 मिळाली. औरंगाबादेत सतीश चव्हाण यांची विजयाची हॅट‌्ट्रिक औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा दारुण पराभव करत सतीश चव्हाण यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येण्याचा बहुमान मिळवला आहे. हेही वाचा...चोरट्यांनी शोधला नवा फंडा! ऑटो रिक्षाच्या नंबर प्लेटला पिवळा रंग फासला आणि... सतीश चव्हाण यांना 1 लाख 18 हजार 638 मते मिळाली तर शिरीष बोराळकर यांना 58 हजार 743 मते मिळाली. एकूण वैध मते 2 लाख 18 हजार 816 तर 23092 मते बाद ठरली. सतीश चव्हाण यांनी विजय मिळवताच आघाडी घेताच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केलं. मतमोजणीच्या आणखी दोन फेऱ्या शुक्रवारी पहाटेपर्यंत सुरू होत्या.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Devendra Fadnavis, Maharashtra, Nagpur

    पुढील बातम्या