चोरट्यांनी शोधला नवा फंडा! ऑटो रिक्षाच्या नंबर प्लेटला पिवळा रंग फासला आणि...

चोरट्यांनी शोधला नवा फंडा! ऑटो रिक्षाच्या नंबर प्लेटला पिवळा रंग फासला आणि...

कल्याण पश्चिमेतील झुंजारराव मार्केटमध्ये एका मोठी इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाची दुकान फोडी झाली

  • Share this:

कल्याण, 4 डिसेंबर: नंबर प्लेटवर पिवळा रंग फासलेली एक ऑटो रिक्षा (Auto rickshaw) प्रवाशांना घेऊन शहरातून फिरत आहे, हे समजताच पोलिसांनी तपास सुरु केला असता धक्कादायक माहिती समोर आली. रिक्षा चालविणारा तसेच रिक्षातून प्रवासी म्हणून फिरणारे दुसरे तिसरे कोणी नसून चक्क चोरटे आहेत. या प्रकरणी कल्याण पोलिसांनी (Kalyan Police) चौघांना अटक करुन पुढील सुरु केला आहे.

हेही वाचा...पुण्यात भाजपचा गड ढासळला, महाविकास आघाडीचे अरुण लाड यांचा दणदणीत विजय 

मिळालेली माहिती अशी की, कल्याण पश्चिमेतील झुंजारराव मार्केटमध्ये एका मोठी इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाची दुकान फोडी झाली होती. त्या दुकानातून महागडी वायर चोरीस गेल्या होत्या. रात्रीच्या वेळेस स्टेशन परिसराला लागून या मार्केटमध्ये चोरी झाल्याने व्यापारी वर्ग हैराण झाला होता. कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस निरिक्षक नारायण बानकर यांनी या प्रकरणाचा तपास पोलिस अधिकारी दीपक सरोदे यांना दिला.

काही दिवसात एका माहितीदाराने पोलिसांना माहिती दिली की रात्रीच्या वेळी एक रिक्षा फिरते. तिच्या नंबर प्लेटवर पिवळा रंग फासला आहे. ही माहिती मिळताच पोलिसांनी त्या रिक्षा चालकाचा शोध सुरु करुन त्याला ताब्यात घेतले. जी माहिती समोर आली ती धक्कादायक होती. रिक्षा चालकासह रिक्षात प्रवासी म्हणून बसणारे दुसरे कोणी नाही तर चोर होते. रात्रीच्या वेळी चोरीचा काम करीत होते.

पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे बायी यादव, विनय विश्वकर्मा, अभिजीत बहिरे आणि एक अल्पवयीन तरुण आहे. अल्पवयीन चोरटय़ास बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. अन्य तीन आरोपींना न्यायालयात हजर केले असता. त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा...औरंगाबादेत भाजपचा धुव्वा, राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांची विजयाची हॅट‌्ट्रिक

विशेष म्हणजे याच चार जणांनी मिळून ग्राइंडर मशिनच्या साह्याने इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान फोडले होते. त्यांच्याकडून तब्बल सव्वा दोन लाखाचा चोरीस गेलेला माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यांनी आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस अधिकारी दीपक सर्योदय यांनी दिली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 4, 2020, 8:51 AM IST

ताज्या बातम्या