MLC Election Results 2020: पुण्यात भाजपचा गड ढासळला, महाविकास आघाडीचे अरुण लाड यांचा दणदणीत विजय 

MLC Election Results 2020: पुण्यात भाजपचा गड ढासळला, महाविकास आघाडीचे अरुण लाड यांचा दणदणीत विजय 

'चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा'

  • Share this:

पुणे, 4 डिसेंबर: पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांची पराभव करत 48 हजार 824 हजारांच्या मताधिक्यानी दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीचे अरुण लाड यांना एकूण 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली तर भाजपचे संग्राम देशमुख यांना 73 हजार 321 मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे प्रचारकार्यांत उतरल्यानं यंदा पुण्याची लढत त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली होती.

हेही वाचा...औरंगाबादेत भाजपचा धुव्वा, राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांची विजयाची हॅट‌्ट्रिक

धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा पहिला निकाल भाजपच्या बाजूनं लागला. भाजपचे अमरीश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागलं होतं. त्यात पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारली.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक मतमोजणीला गुरूवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास सुरुवात झाली. निकालाचा पहिला प्रथम पसंतीचा कल हाती आला तेव्हा महाविकास आघाडीचे अरुण लाड यांनी आघाडी घेतली होती. भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख पिछाडीवर होते. शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे नेते जयंत आसगावकर आघाडीवर होते.

यांच्यात झाली काट्याची लढत

पुण्यात खरी लढत भाजपचे संग्राम देशमुख आणि राष्ट्रवादीचे अरूण लाड यांच्यात झाली. जो पक्ष जास्त मतदान घडवून आणेल त्याचा विजय निश्चित समजला जाणार आहे. पण मनसेच्या रूपाली पाटील यांनी जास्त मतं घेतली तर त्याचा फटका भाजपला बसू शकतो. पुणे पदवीधरमधून मागील वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील विजयी झाले होते. पण ते आता कोथरूडमधून विधानसभेत गेल्याने यावेळी सांगलीचे संग्राम देशमुख भाजपतर्फे मैदानात होते. तर राष्ट्रवादीकडून गेल्या वेळी थोड्याफार फरकाने पराभूत झालेले अरूण लाड पुन्हा नशीब आजमावण्यासाठी रिंगणात उतरले होते. अखेर त्यांनी भाजपचा गडाला खिंडार पाडत विजश्री खेचून आणली. मध्यरात्री अंतिम निकाल येण्यापूर्वीच अरुण लाड यांच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष सुरू केला होता. गुलालाची उधळण करत जोरदार घोषणाबाजी सुरु केली आहे.

हेही वाचा...कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा मोठी वाढ, मृत्यूचा आकडा वाढला

चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा...

पुण्यात महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे भाजपने हातातली आणखी एक जागा गमावली आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचं बोललं जात आहे. त्यात शिवसेना नेते पुरुषोत्तम बरडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, असे वक्तव्य पुरुषोत्तम बरडे यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामुळे यंदा पुण्याची लढत प्रतिष्ठेची झाली होती.

Published by: Sandip Parolekar
First published: December 4, 2020, 8:20 AM IST

ताज्या बातम्या