मोगा, 20 एप्रिल : देशभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. 17 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर अनेक लग्न कॅन्सल करण्यात आली आहेत. तर काहींनी लग्नाचे मुहूर्त पुढे ढकलले आहेत. काही तरुण-तरुणी लॉकडाऊनचे नियम पाळून लग्न करत आहेत. काही जण ऑनलाईन, फेसबुक, व्हॉट्सअॅप कॉलिंगवर लग्न करत आहे. सिंधुदुर्गानंतर आता पंजाबमध्ये नवरदेव आणि नवरीनं लग्न केलं आहे. वरात ना वऱ्हाड दोघांनीच लग्न करून बाईकवरून घरी जात होते. लॉकडाऊनचे नियम पाळून या दोघांनी लगीनगाठ बांधली आहे. पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील बाघापुराना इथे दोघांनी लग्न केलं आणि आपल्या दुचाकीवरून घरी निघाले. लॉकडाऊनचे नियम पाळून हे लग्न केल्यानं पोलिसांनी त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंगचं भान राखून केवळ 5 जणांना त्यांनी सोबत घेतलं आणि लगीनगाठ बांधली. पोलिसांनी त्यांना केक कापून शुभेच्छा दिल्या आणि पोलिसांचं एक पथक त्यांना घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आलं होतं. नवविवाहित जोडप्याला पोलिसांनी अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा दिल्या. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंग बाळगून हे लग्न केल्यानं पोलिसांनी खास शुभेच्छा दिल्या. हे वाचा- पिझ्झा डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात आलेल्या कुटुंबांना रिपोर्ट्सनंतर मिळाला दिलासा पोलिसांनी त्यांचं कौतुकही केलं आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी घरी राहण्याचं आणि अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. पंजाबमध्ये 3 मेपर्यंत कर्फ्यू लागू राहणार आहे. तिथले नियम शिथील न करण्यावर सरकार ठाम आहे. देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढून 17 हजाराहून अधिक झाली आहे. आतापर्यंत 17265 प्रकरणे नोंदली गेली आहेत. याशिवाय 543 लोकांचा मृत्यू झाला आहे.या क्षणी देशातील विविध रुग्णालयात 3,295 कोविड-19 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशातील कोरोनामधून बरे होणाऱ्या संख्या सातत्याने सुधारत आहे. हे वाचा- पालघर प्रकरणावर अमित शहांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाले…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.