नवी दिल्ली, 20 एप्रिल : कोरोनाव्हायरसपासून (Coronavirus) बचावासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. यावर अद्याप तरी औषध, लस सापडली नाही. मात्र तरीही सोशल मीडियावर अनेक उपचारांचा भडीमार होतो आहे आणि कोरोनाव्हायरसच्या भीतीपोटी लोकं त्याचा अवलंबही करत आहेत. यापैकी बहुतेक उपाय हे जीवघेणेही ठरू शकतात, असाच सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला उपाय म्हणजे क्लोरीन डायऑक्साइड (Chlorine Dioxide).
जीवघेणं असं क्लोरीन डायऑक्साइड (Chlorine Dioxide) हे कोरोनाव्हायरसवरील उपचार मानलं जात आहे. याबाबत लोकांनी सोशल मीडियावर आपला अनुभव मांडला आहे. बीबीसीने याबाबत वृत्त दिलं आहे. इक्वाडोरच्या अस्थमा रुग्णानं या केमिकलबाबत आपला अनुभव शेअर केला आहे.
हे वाचा - कोविड -19 चा पॅरिसमध्ये नवा धोका, पाण्यावर मिळाला कोरोना व्हायरस
या रुग्णाने सांगितलं, "मी माझी कोरोना टेस्ट केली नव्हती. सुपरमार्केटमध्ये मी अनेकांच्या संपर्कात आली त्यानंतर मला काही वेळानं ताप आला, खूप थकवा जाणवू लागला. डोळे आणि डोकं दुखू लागलं. आठवडाभरात मला कोणत्या पदार्थाची चव लागत नव्हती, वास येत नव्हता. कोरोना व्हायरसच्या रुग्णआंमध्ये अशीच लक्षणं दिसत होती. मी आठवडाभर स्वत:ची पूर्ण काळजी घेतली. मात्र क्लोरीन डायऑक्साइडच्या वापरानंतर मला माझ्यात सुधारणा दिसली. पुढच्या दिवशी लगेच माझी घशाची समस्या आणि ताप गायब झाला, मला खूप बरं वाटत होतं. मी यआधीही क्लोरीन डायऑक्साइडचा वापर केला होता"
हे वाचा - 'या' देशात रुग्णांवर उपचार सोडून वैद्यकिय कर्मचारी वाचवत आहेत स्वत:चा जीव
फक्त कोरोनाव्हायरसवरच नाही तर याआधी लोकं या केमिकलला मलेरिया, डायबेटिज, अस्थमा, ऑटिझ्म आणि कॅन्सरवरील उपचार म्हणत असतं. मात्र जागतिक आरोग्य संघटनेनं क्लोरीन डायऑक्साइडला औषध म्हणून मान्यता दिलेली नाही. हे केमिकल औषध म्हणून पिणाऱ्याच्या आरोग्याला गंभीर हानी पोहोचू शकते.
काय आहे क्लोरीन डायऑक्साइड?
याला डिस्टिल वॉटरमध्ये (पाणी उकळून त्याचं वाफेत रूपांतर करणं आणि पुन्हा वाफ थंड करून त्याचं पाण्यात रुपांतर करणं) सोडियम क्लोराइट मिसळून क्लोरीन डायऑक्साइड तयार केलं जातं. याचा उपयोग साफसफाईसाठी केला जातो.
हे वाचा - जिमला न जाता अभिनेत्री असं ठेवते स्वतःला फिट, लॉकडाऊनमध्ये फॉलो करा सोप्या टिप्स
कंप्लुटेन्स युनिव्हर्सिटी ऑफ मॅड्रिडमधील केमिस्ट्रीचे प्राध्यापक मिगेल एंजेल सिएरा रॉड्रिग्ज सांगतात, हे असं किटकनाशख आहे, ज्याचा वापर उद्योगांमध्ये केला जातो. खाण्यापिण्यासाठी याचा वापर करू नये. कोरोनाव्हायरसवर क्लोरीन डायऑक्साइडचा काहीच परिणाम होत नाही.
क्लोरीन डायऑक्साइडचे दुष्परिणाम
अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनच्या मते, या केमिकलमुळे रेस्पिरेटरी सिस्ट आणि लिव्हर काम करणं बंद करतं. कारी प्रकरणात हार्टबिट इतके असामान्य होतात की रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. याशिवाय लाल रक्तपेशींना हानी, उलटी, डायरियाही होऊ शकतो. क्लोरीन डायऑक्साइडचा औषध म्हणून वापर केल्यानंतर समस्या उद्भवल्यास वैद्यकीय मदत मिळण्यास उशीर झाला तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. एफडीएने 8 एप्रिलला जारी केलेल्या सूचनेनुसार, क्लोरीन डायऑक्साइडमुळे रुग्णाला काही फायदा होतो, याचा वैज्ञानिक पुरावा नाही. यामुळे रुग्णाच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते.
संकलन, संपादन - प्रिया लाड
हे वाचा - जगभरात शेकडो Coronavirus, आतापर्यंत 7 मानवासाठी ठरले घातक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus