मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

राऊतांचा टोला की पाठिंबा? म्हणाले - स्वबळावर लढून काँग्रेसचा पंतप्रधान बनवा, पाठिंबा देऊ

राऊतांचा टोला की पाठिंबा? म्हणाले - स्वबळावर लढून काँग्रेसचा पंतप्रधान बनवा, पाठिंबा देऊ

SANJAY RAUT PRESS CONFERENCE स्वबळावर लढून जर ते केंद्रात सत्ता आणणार असतील, मोदींना आव्हान उभे करत असतील तर त्यांचं स्वागत आहे. त्यांनी सत्ता आणून काँग्रेसचा पंतप्रधान बनवावा, आमचा त्यांना पाठिंबा असेल असंही पटोले म्हणाले.

जळगाव, 11 जून : संजय राऊत (Sanjay Raut) यांची विरोधक म्हणजे प्रामुख्यानं भाजपच्या नेत्याबरोबर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. तसंच आता काँग्रेसच्या नाना पटोलेंचाही (Nana Patole) शब्द राऊत खाली पडू देत नसल्याचं दिसतंय. नाना पटोलेंनी शुक्रवारी अमरावतीमध्ये (Amaravati) दुपारी स्वबळाची भाषा केली. त्यांनी स्थानिक आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा केली. त्यावर राऊतांनीही त्याला प्रत्युत्तर देत जणू टोला लगावला आहे.

(वाचा - "काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी भाजपमधील अनेक जण इच्छुक, मोठी लिस्ट तयार")

नाना पटोले यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचं वक्तव्य केलं. काँग्रेसकडून पुन्हा स्वबळाची भाषा झाल्यानं, संजय राऊतांनी त्यांना उत्तर दिलं. नाना पटोले स्वबळावर निवडणुका लढत असतील तर त्यांचं स्वागत आहे. स्वबळावर लढून जर ते केंद्रात सत्ता आणणार असतील, मोदींना आव्हान उभे करत असतील तर त्यांचं स्वागत आहे. त्यांनी सत्ता आणून काँग्रेसचा पंतप्रधान बनवावा, आमचा त्यांना पाठिंबा असेल असंही पटोले म्हणाले.

(वाचा-राऊतांनी केलेलं मोदींचं कौतुक पटोलेंना पटेना, म्हणाले-सर्टिफिकेट देणारे ते कोण?)

पण पटोले यांनी राज्यात स्वबळावर लढणार म्हटलं आणि राऊतांनी केंद्रात सत्ता आणून दाखवा असं आव्हान दिलं. त्यामुळं राऊतांनी पटोलेंना टोला तर लगावला नाही, अशा चर्चाही सुरू झाल्या आहेत. सरकारने दीड वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. उर्वरित साडेतीन वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच राहतील. तसंच सरकार हे तीन पक्षांचंच असेल आणि निवडणुका ठरलेल्या वेळेतच होतील, असंही राऊत जळगावच्या चोपडा इथं बोलताना म्हणाले.

दरम्यान, पटोले स्वबळाची भाषा वापरत असले तरी, राऊतांनी एकत्र लढण्यावर जोर दिलेला पाहायला मिळालं. शरद पवार हे सरकारचे, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. त्यांनी सूतोवाच केलं आहे आणि तीच राज्यातल्या जनतेच्या मनातली भावना आहे. निवडणुका एकत्र लढाव्या लागतील. आजची राज्याची व्यवस्था अशीच पुढे न्यायची असेल तर पवार साहेब जे सांगत आहेत, त्यानुसार निवडणुका एकत्र लढून पुढे जावे लागेल, असं राऊत म्हणाले. त्यामुळं तिघांच्या सरकारमध्ये काँग्रेसची भूमिका सध्यातरी वेगळी दिसत आहे.

First published:

Tags: Nana Patole, Sanjay raut, Sharad pawar