• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • "भाजपमधील अनेक नेते काँग्रेस प्रवेशासाठी इच्छुक, मोठी लिस्ट तयार" नाना पटोलेंचा गौप्यस्फोट

"भाजपमधील अनेक नेते काँग्रेस प्रवेशासाठी इच्छुक, मोठी लिस्ट तयार" नाना पटोलेंचा गौप्यस्फोट

काँग्रेस पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे.

  • Share this:
अमरावती, 11 जून: राज्यात शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) या तिन्ही पक्षांची एकत्रित सत्ता असली तरी आगामी निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आहे. यासाठी काँग्रेस पक्षाने तयारी सुद्धा सुरू केली आहे. यासोबतच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दावा केला आहे की, भारतीय जनता पक्षातील अनेकजण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक (BJP leaders excited to join congress) आहेत. काँग्रेस नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत या प्रश्नावर नाना पटोले यांनी म्हटलं, भाजपमधून अनेक लोक काँग्रेस पक्षात येण्यास तयार आहेत, माझ्याकडे मोठी लिस्ट तयार आहे. नाना पटोले यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. काँग्रेस प्रवेशासाठी इच्छुक असलेले ते भाजप नेते कोण? असा सवालही विचारला जात आहे. आघाडीत बिघाडी? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तसेच विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत व विधानसभा निवडणुकीत आघाडीत फूट पडणार असे दिसत आहे. राऊतांनी केलेलं मोदींचं कौतुक पटोलेंना पटेना, म्हणाले-सर्टिफिकेट देणारे ते कोण? ... तर अमरावतीची जागा कोण लढणार? नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाले आहे. अमरावती लोकसभेसाठी पोट निवडणूक झाल्यास ती कोण लढवणार? या प्रश्नावर नाना पटोले म्हणाले, अमरावती लोकसभेची जागा काँग्रेसच्या कोट्यात आहे त्यामुळे अमरावतीची जागा काँग्रेस लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
Published by:Sunil Desale
First published: