• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • राऊतांनी केलेलं मोदींचं कौतुक पटोलेंना पटेना, म्हणाले-सर्टिफिकेट देणारे ते कोण?

राऊतांनी केलेलं मोदींचं कौतुक पटोलेंना पटेना, म्हणाले-सर्टिफिकेट देणारे ते कोण?

मोदींना पदाच्या खाली खेचण्याचा आणि भाजपला समूळ नष्ठ करायचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे. म्हणून कोण काय सर्टिफिकेट देतं ते महत्त्वाचं नाही. लोकशहीत जना मोठी असते अशी अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

 • Share this:
  अमरावती, 11 जून : सत्तेत एकत्र असले तरी गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेस (CONGRESS) सरकारवर नाराज दिसतंय. त्यात शिवसेना विरुद्ध काँग्रेस (Shivsena and Congress) आणि विशेषतः राऊत विरुद्ध काँग्रेस  (Sanjay Raut) असंही चित्र रंगत आहे. असं असतानाच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी संजय राऊतांवर पुन्हा एकदा टीका केली आहे. संजय राऊत यांनी मोदींचं कौतुक केलं पण मोदींना सर्टिफिकेट देणारे संजय राऊत कोण असा सवाल नाना पटोलेंनी केला आहे. (वाचा-Good News : जूनच्या दुसऱ्याच आठवड्यात भरला आशियातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प) संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर दोन ते तीन वेळा मोदींचं कौतुक केलं आहे. तसंच सामनामधूनही मोदींचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. पण हे कौतुक काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मात्र पटलेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्टिफिकेट देणारे संजय राऊत कोण आहेत? असा सवाल पटोले यांनी केला. संजय राऊत यांना सर्टिफिकेट देण्याची जबाबदारी राज्याच्या नागरिकांनी दिली की देशाच्या असंही पटोले म्हणाले आहेत. (वाचा-मुसळधार पावसात घराची भिंत कोसळून चिमुकलीचा मृत्यू, 3 गंभीर जखमी) पंतप्रधानपद हे देशाचं सर्वोच्च पद आहे. पण नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची गरिमा संपविली आहे. देशातील अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत, देशातला तरुण बेरोजगार झाला, तीन काळे कायदे लागू करुन शेतकऱ्यांना संपवण्याची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळं मोदींना पदाच्या खाली खेचण्याचा आणि भाजपला समूळ नष्ठ करायचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे. म्हणून कोण काय सर्टिफिकेट देतं ते महत्त्वाचं नाही. लोकशहीत जना मोठी असते अशी अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. पुन्हा स्वबळाचा नारा भाजप हा आमचा जन्मत: विरोधी पक्ष आहे. पवार साहेब भाजप विरोधात मोट बांधत असतील तर, ती चांगली गोष्ट आहे. मात्र महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं. त्यामुळं काँग्रेसकडून पुन्हा एकदा स्वबळाची भाषा समोर आल्यानं खरंच महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.
  Published by:News18 Desk
  First published: