मुंबई, 17 सप्टेंबर : देशाता कोरोनाचा धोका तर आहेच अशात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. राज्यातल्या कोरोनाच्या आकड्यांनी फक्त इतर राज्यांनाच नाही अनेक देशांनाही मागे टाकलं आहे. याच दरम्यान, आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारची बाजू सांभाळत राज्यात रिकव्हरी रेट वाढला असल्याचं म्हटलं आहे. यावेळी धारावीचा हवाला देत राऊत म्हणाले की, 'यापूर्वी सभागृहातील अनेक खासदारांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती म्हणून मी वस्तुस्थिती मांडत आहे.
माझी आई आणि भाऊदेखील कोरोना संक्रमित होते अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात कोरोना वाढला असला तरी असंख्य लोक बरे होत आहेत. धारावीमध्ये आज परिस्थिती अगदी नियंत्रणात आहे. याबबतीत WHOने देखील मुंबई महापालिकेचं कौतूक केलं आहे.
'जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे का??'
यावेळी राऊत यांनी केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या 'भाभीजी के पापड' वरही टीका केली. राऊत म्हणाले की, मला सदस्यांना विचारायचं आहे की कोरोना झालेले इतके लोक बरे कसे झाले? भाभीजीचा पापड खाऊन लोक बरे झाले का? असा सवाल यावेळी त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की, 'ही राजकीय लढाई नाही तर लोकांचे प्राण वाचवण्याची लढा आहे.' विशेष म्हणजे कोरोना विषाणूच्या विषयावर आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या विधानावरील चर्चेदरम्यान राऊत बोलत होते.
I want to ask the members how did so many people recover? Kya log bhabhi ji ke papad kha karke theek ho gaye? This isn't a political fight but a fight to save the lives of people: Shiv Sena MP Sanjay Raut during a discussion on the Statement made by Health Minister on COVID19 https://t.co/hswIFDPTlc
— ANI (@ANI) September 17, 2020
दरम्यान, 15 सप्टेंबर रोजी (काल) राज्यात 515 रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब राज्याच्या आरोग्य विभागाने दिली होती. बुधवारी राज्यात 474 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारच्या तुलनेत ही संख्या कमी असली तरी बुधवारी राज्यात 23365 नवीन कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. हा आकडा गेल्या काही दिवसांच्या तुलनेत जास्त आहे.
सरकारने पोलीस भरतीचा घेतलेला निर्णय हा मूर्खपणाचा, छत्रपती संभाजी राजेंची टीका
काल राज्यात 474 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.75 % इतका आहे. तर गेल्या 24 तासांत 17559 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात आजपर्यंत एकूण 792832 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 70.71 टक्के इतका झाला आहे.