नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : महाविकास आघाडीने 12 हजार 500 जागांच्या पोलीस भरतीचा घेतलेला निर्णय हा मूर्खपणाचा आहे अशा शब्दात राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजी राजे यांनी सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात मराठा समाजही पेटून उठला आहे. अनेक ठिकाणी आज आक्रमक आंदोलनाला सुरूवात झाली आहे. मराठा आरक्षणाची सध्या लढाई सुरू आहे आणि यात राज्यात कोरोनाचा प्रकोप आहे. अशावेळी पोलीस भरती करणे कितपत योग्य आहे असा सवाल छत्रपती संभाजी राजे यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रात 12 हजार 500 पोलिसांची भरती ( Maharashtra police bharti 2020) केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाकडूनही मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण असं असलं तरी याचा फायदा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना होणार नसल्यामुळे राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
'लोकल सुरू करा अन्यथा मी कायदेभंग करेन', संदीप देशपांडे यांचा सरकारला इशारा
कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळे विविध क्षेत्रांतील भरतील प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात लवकरच मेगा पोलीस भरतीसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे.
SSR प्रकरणात मुंबईत आलेली CBI टीम दिल्लीला रवाना, होणार महत्त्वाची बैठक
कोविड काळात पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस भरतीबाबत निर्णय घेण्यात आला. तब्बल साडे बारा हजार पोलिसांची भरती यातून होऊ शकणार आहे. अनेक पोलिसांना कोविडची लागण झाल्याने पोलिसांचं पुरेसे संख्याबळ उपलब्ध नाही. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पोलीस भरतीबाबत हालचाली सुरू केल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maratha reservation