मुंबई, 17 सप्टेंबर : राज्यात कोरोनाचं महासंकट असताना आता मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटून उठला आहे. अशात राज्यात ठाकरे सरकारने घेतलेल्या पोलीस भरतीच्या निर्णयाचा सर्व स्तरातून विरोध होताना दिसत आहे. राज्यात इतिहासातली सर्वात मोठी मेगा भरती झाली आहे. मराठा आरक्षण स्थगित झाल्यावर ही मेगा भरती का करण्यात आली असा सवाल भाजप नेते नितेश राणे यांनी उपस्थित केला आहेत. इतकंच नाही तर हा आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची जळजळीत टीका नितेश राणे यांनी केली आहे.
यासंबंधी त्यांनी ट्विटरवर एक ट्वीट केलं आहे ज्यामध्ये असं लिहलं की, 'जो पर्यंत मराठा आरक्षण परत लागु होत नाही तो पर्यंत मेघा भरती कशाला ??? आगीत तेल टाकत आहात. जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे का??' असा थेट सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, सरकारच्या या मेगा भरती निर्णयावर राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजी राजे यांनी सरकारवर टीका केली आहे.
सरकारने पोलीस भरतीचा घेतलेला निर्णय हा मूर्खपणाचा, छत्रपती संभाजी राजेंची टीका
राज्यात इतिहासातली सर्वात मोठी मेगा भरती.. मराठा आरक्षण स्थगित झाल्यावर ?? जो पर्यंत मराठा आरक्षण परत लागु होत नाही तो पर्यंत मेघा भरती कशाला ??? आगीत तेल टाकत आहात.. जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे का??
— nitesh rane (@NiteshNRane) September 17, 2020
महाविकास आघाडीने 12 हजार 500 जागांच्या पोलीस भरतीचा घेतलेला निर्णय हा मूर्खपणाचा आहे अशा शब्दात राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजी राजे यांनी सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात मराठा समाजही पेटून उठला आहे. अनेक ठिकाणी आज आक्रमक आंदोलनाला सुरूवात झाली आहे. मराठा आरक्षणाची सध्या लढाई सुरू आहे आणि यात राज्यात कोरोनाचा प्रकोप आहे. अशावेळी पोलीस भरती करणे कितपत योग्य आहे असा सवाल छत्रपती संभाजी राजे यांनी उपस्थित केला आहे.
'लोकल सुरू करा अन्यथा मी कायदेभंग करेन', संदीप देशपांडे यांचा सरकारला इशारा
दरम्यान, महाराष्ट्रात 12 हजार 500 पोलिसांची भरती ( Maharashtra police bharti 2020) केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाकडूनही मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण असं असलं तरी याचा फायदा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना होणार नसल्यामुळे राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळे विविध क्षेत्रांतील भरतील प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात लवकरच मेगा पोलीस भरतीसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Lockdown, Maratha reservation, Uddhav thackeray