सुदैवाने या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाहीये. अपघात झाल्याचं कळताच त्या ठिकाणाहून जाणाऱ्या नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. काळजाचा ठोका चुकवणारा हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाला असल्याचं बोललं जात आहे. औरंगाबादमध्ये भीषण अपघात औरंगाबाद - जालना महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. एसटी बस आणि बोलेरो पिकअप गाडीची धडक झाली आहे. या भीषण अपघातात 7 जण जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ समोर आला आहे. औरंगाबाद-जालना मार्गावर गाढेजळगाव फाट्याजवळ हा अपघात घडला आहे. एसटी बस आणि बोलेरो पिकअपची धडक झाली आहे. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात बोलेरो गाडीचा चक्काचूर झाला आहे. गाडीच्या समोरील भाग अक्षरश: चुराडा झाला आहे. मजुरांना घेऊन ही बोलेरो व्हॅन औरंगाबादच्या दिशेनं येत होती. भरधाव वेगात येणाऱ्या या बोलेरो पिकअप व्हॅनवरून चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी थेट विरुद्ध दिशेनं डिव्हाडर तोडून गेली. नेमकं त्याचवेळी समोरून एसटी बस येत होती. यावेळी बसने जोराची बोलेरो गाडीला धडक दिली या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. मदतकार्य चालू असून जखमींना औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.कोल्हापुरात जीप आणि दुचाकीचा भीषण अपघात pic.twitter.com/RIKiEr67CR
— News18Lokmat (@News18lokmat) May 26, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Bike accident, Cctv, Kolhapur