Home /News /maharashtra /

डिव्हायडर तोडून बोलेरो गाडी समोरून येणाऱ्यावर बसवर आदळली, औरंगाबादच्या अपघाताचा LIVE VIDEO

डिव्हायडर तोडून बोलेरो गाडी समोरून येणाऱ्यावर बसवर आदळली, औरंगाबादच्या अपघाताचा LIVE VIDEO

 बोलेरो पिकअप व्हॅनवरून चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी थेट विरुद्ध दिशेनं डिव्हाडर तोडून गेली

बोलेरो पिकअप व्हॅनवरून चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी थेट विरुद्ध दिशेनं डिव्हाडर तोडून गेली

बोलेरो पिकअप व्हॅनवरून चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी थेट विरुद्ध दिशेनं डिव्हाडर तोडून गेली

औरंगाबाद, 25 मे : औरंगाबाद - जालना महामार्गावर (Aurangabad Jalna Highway) भीषण अपघात झाला आहे. एसटी बस आणि बोलेरो पिकअप गाडीची धडक (bus and bolero car accident) झाली आहे. या भीषण अपघातात 7 जण जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ समोर आला आहे. औरंगाबाद-जालना मार्गावर गाढेजळगाव फाट्याजवळ हा अपघात घडला आहे. एसटी बस आणि बोलेरो पिकअपची धडक झाली आहे. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात बोलेरो गाडीचा चक्काचूर झाला आहे. गाडीच्या समोरील भाग अक्षरश: चुराडा झाला आहे. मजुरांना घेऊन ही बोलेरो व्हॅन औरंगाबादच्या दिशेनं येत होती. भरधाव वेगात येणाऱ्या या बोलेरो पिकअप व्हॅनवरून चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी थेट विरुद्ध दिशेनं डिव्हाडर तोडून गेली. नेमकं त्याचवेळी समोरून एसटी बस येत होती. यावेळी बसने जोराची बोलेरो गाडीला धडक दिली. या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. मदतकार्य चालू असून जखमींना औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. जळगावात चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार दरम्यान, जळगावमध्ये शिरसोली ते वावडदा रस्त्यावर दुचाकीस्वाराला भरधाव चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने 20 वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली. रणजित संभाजी पानगडे हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. आज दुपारीच्या सुमारास शिरसोली ते वावडदा रस्त्याने रणजित पानगडे हा दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव महिंद्रा पिकअप व्हॅन जोरदार धडक दिली. या धडकेत रणजीत पानगडे हा जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन तातडीने त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मदत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या