S M L

कपिल पाटील यांची विजयाची हॅट्ट्रिक,भाजप-सेना पराभूत

शिक्षक मतदार संघात भाजप पुरस्कृत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे उमेदवार अनिल देशमुख यांचा दारुण पराभव झालाय.

Sachin Salve | Updated On: Jun 28, 2018 10:02 PM IST

कपिल पाटील यांची विजयाची हॅट्ट्रिक,भाजप-सेना पराभूत

मुंबई, 28 जून :  मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत कपिल पाटील यांनी विजयाची हॅट्ट्रिक केलीय. मुंबई शिक्षक मतदारसंघाचा हा गड लोकभारतीचे कपिल पाटील यांनी राखला. कपिल पाटील यांनी शिवसेनेचे शिवाजी शेंडगे आणि भाजप पुरस्कृत अनिल देशमुख यांचा पराभव केला.

शिक्षक मतदार संघात भाजप पुरस्कृत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे उमेदवार अनिल देशमुख यांचा दारुण पराभव झालाय. अनिल देशमुख हे तिसऱ्या क्रमाकांवर फेकले गेले.  कपिल पाटील यांना 4050 मतं मिळाली. तर शिवसेनेचे उमेदवार शिवाजी शेंडगे यांना 1736 तर अनिल देशमुख यांना 1124 मतं मिळाली. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत विनोद तावडे विरुद्ध कपिल पाटील असा आखाडा रंगला होता. यातकपिल पाटील यांचा दणदणीत विजय झालाय.

तर कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावघरे आघाडीवर आहेत. मुंबई पदवीधर मतदारसंघात विलास पोतनिस आघाडीवर आहेत. विधानपरिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे यांनी 20 हजार मतांमध्ये साडेचार हजार मतांनी आघाडी घेतली. चार जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत शिवसेना 2 जागांवर आघाडीवर आहे.

हेही वाचा

घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, महिला पायलटसह 5 जणांचा मृत्यू

Loading...

 VIDEO : विमान कोसळण्याचा थरार सीसीटीव्हीत कैद

Ghatkopar Plane Crash : तो अर्धा तास..,विमान दुर्घटनेचा घटनाक्रम

 Ghatkopar Plane Crash : नवखी होती विमानसेवा देणारी कंपनी

 काय घडलं घाटकोपरमध्ये? : प्रचंड स्फोट, आगीचे लोट आणि घाबरलेले जीव

चार्टर्ड विमानाच्या अपघातानंतर नक्की काय घडलं?

 कसा झाला चार्टर्ड विमानाचा अपघात?

 घाटकोपर विमान अपघात : थोडक्यात वाचला 40 कामगारांचा जीव, नाही तर...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2018 10:02 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close