मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Ghatkopar Plane Crash : तो अर्धा तास..,विमान दुर्घटनेचा घटनाक्रम

Ghatkopar Plane Crash : तो अर्धा तास..,विमान दुर्घटनेचा घटनाक्रम

  मुंबई, 28 जून :  घाटकोपरमध्ये सर्वोदय रुग्णालय परिसरात जीवदया नगरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलंय. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. अवघ्या अर्ध्या तासात होत्याचं नव्हतं झालं.

  दुपारी एक वाजता हे विमान जुहूवरून पायलट, को-पायलट  आणि 2  तंत्रज्ञ असे एकूण चार जणांना घेऊन उड्डाण भरलं. अर्ध्या तासानंतर घाटकोपर पश्चिम परिसरात जागृती पार्क जवळ जीवदया लेनमध्ये बांधकाम सुरू असलेल्या परिसरात हे चार्टर्ड विमान कोसळलं.या दुर्घटनेत  रस्त्यावरून गाडीवर जाणाऱ्या एकाचाही मृत्यू झालाय. तर 21 वर्षांचा लवकुश कुमार आणि 24 वर्षांचा नरेश कुमार निशाद हे दोन तरुण जखमी झालेत.

  घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, महिला पायलटसह 5 जणांचा मृत्यू

  पोलीस प्रशासन, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि आग आटोक्यात आणली.  घाटकोपरमधील सर्वोदय रुग्णालयाजवळील माणिकलाल परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत हे विमान कोसळल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. त्यानंतर हे विमान उड्डाणासाठी पूर्णत: सज्ज आहे का? हे तपासण्यासाठी आजची चाचणी घेण्यात येत होती. त्याच वेळी ही दुर्घटना घडली असल्याची माहिती आहे.

  कसा झाला चार्टर्ड विमानाचा अपघात?

  घटनाक्रम

  -  दुपारी एकच्या सुमारास जुहूवरुन उड्डाण

  - सर्वोदय रुग्णालयाजवळ दुपारी 1.30वाजता विमान कोसळलं

  - विमान दुर्घटनेत पायलटसह 5 जणाचा मृत्यू

  - विमान दुर्घटनेत एका पादचाऱ्याचाही मृत्यू

  - विमान कोसळल्यानंतर परिसरात आगीचे लोट

  - इमारतीच्या टेरेसवर कोसळलं विमान

  - यूपी सरकारने हे विमान UY एव्हिएशनला विकलं होतं

  - अलाबादलाही याच विमानाला अपघात झाला होता

  - अपघातग्रस्त विमानाचं नाव 'KING AIR C90'

  - टेस्ट फ्लाईटदरम्यान यूपीचं विमान घाटकोपरमध्ये कोसळलं

  - अपघाग्रस्त विमानाची क्षमता 12 प्रवासी होती

  या अपघातात मृत्यू झालेल्या विमानात असलेल्या कर्मचाऱ्यांची नावं

   - या चार्टड विमानाची पायलट मारिया कुबेर

   - सह पायलट - पी. एस. राजपूत

   - तंत्रज्ञ - सुरभी

  - तंत्रज्ञ - मनिष पांडे

  First published:
  top videos

   Tags: Accident, Charterd, Chartered Aircraft Crash, Chartered Plane Crashes, Ghatkopar, Ghatkopar plane crash, Ghatkoper, Mumbai, Mumbai Plane Crash, NewsTracker, Plane crash, Uttar pradesh