काय घडलं घाटकोपरमध्ये? : प्रचंड स्फोट, आगीचे लोट आणि घाबरलेले जीव

काय घडलं घाटकोपरमध्ये? : प्रचंड स्फोट, आगीचे लोट आणि घाबरलेले जीव

प्रचंड स्फोटानं नागरिक घाबरले....सैरावरा पळायला लागले....दुकानं बंद झाली...वाहतूक खोळंबली...काय घडतंय हे कुणालाच कळत नव्हते...शेवटी विमान कोसळलं ही बातमी आली आणि लोकांनी अपघातग्रस्त ठिकाणी धाव घेतली.

  • Share this:

मुंबई,ता.28 जून : पाऊस असला तरी घाटकोपरमध्ये गुरूवारी नेहमीसारखीच गर्दी होती. सकाळपासून सुरू असलेला पाऊस, पावसामुळं मंदावलेली वाहतूक, वाहतूकीची कोंडी आणि गजबजलेला परिसर, अशा वातवरणातही कधीच न थांबणारे मुंबईकर आपापल्या कामात व्यस्त होते. वेळ दुपारी 1 वाजताची.

घाटकोपरमधला सर्वोदय लेनचा परिसर अचानक प्रचंड मोठा आवाज झाला आणि आगीचे लोळ निघाले, काय झालं हे लोकांना कळालं नाही. प्रचंड स्फोटानं नागरिक घाबरले....सैरावरा पळायला लागले....दुकानं बंद झाली...वाहतूक खोळंबली...काय घडतंय हे कुणालाच कळत नव्हते...शेवटी विमान कोसळलं ही बातमी आली आणि लोकांनी अपघातग्रस्त ठिकाणी धाव घेतली. लोक मदतीला पुढं सरसावले.

तोपर्यंत पोलीस आणि अग्निशमनदलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी मदत कार्याला सुरवात केली. काही वेळातच एन.डी.आर.एफ टीम दाखल झाली. आणि मदत कार्याला वेग आला. महिला पायलट पी.एस.राजपूतने प्रसंगावधान दाखवत विमान मोकळ्या जागेत उतरवल्याने मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. मात्र या दुर्घटनेत विमानातल्या सर्व क्रु सदस्यांचा मृत्यू झाल्यानं प्रत्येक नागरिकाने हळहळ व्यक्त केली.

ब्लॅक बॉक्स सापडला

घाटकोपरमध्ये कोसळलेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. अग्निशमन दल आणि मदत पथकाला हा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. विमान कोसळल्यानंतर प्रचंड मोठा आवाज झाला आणि आग लागली. त्यानंतर अग्निशमन दल, मुंबई पोलीस आणि एनडीआरफची टीम घटनास्थळी दाखल झाली.

मदत पथकाने विमानाचा काही भाग कापून काढला आणि मलबा हटवण्यात आला. त्याचवेळी ब्लॅक बॉक्स शोधण्याचं कामही सुरू होतं. त्या शोधकार्यावेळीच ब्लॅक बॉक्स सापडल्याने विमानाच्या अपघाताचं घरं कारण कळणार आहे. विमानापर्यंत पोहोचणं शक्य असल्याने ब्लॅक बॉक्स शोधायला फारसा वेळ लागला नाही.

मानाचा अपघात झाल्यानंतर मदत पथक सर्वात आधी ब्लॉक बॉक्सच्या शोधात असते. मुंबईतल्या गजबजलेल्या घाटकोपर परिसरात कोसळेल्या विमानानं काही वेळापूर्वीच जुहूच्या धावपट्टीवरून उड्डाण घेतलं होतं. या विमानाची पायलट महिला होती अशीही माहिती मिळाली होती.

टेस्टिंग साठी हे विमान निघालं होतं मात्र काही वेळातच विमानात तांत्रिक बघाड झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विमानात बिघाड झाल्याचं कळताच पायलटने खुल्या जागेत विमान उतरविण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट झालंय. हा परिसर अतिशय दाटीवाटीचा आहे. पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 28, 2018 04:28 PM IST

ताज्या बातम्या