Home /News /news /

Ghatkopar Plane Crash : नवखी होती विमानसेवा देणारी कंपनी

Ghatkopar Plane Crash : नवखी होती विमानसेवा देणारी कंपनी

मुंबई, 28 जून : घाटकोपरमध्ये अपघातग्रस्त विमानसेवा देणारी युवाय कंपनी हवाई वाहतुकीत नवखी असल्याची माहिती मिळतेय. ही कंपनी अवघ्या 4 वर्ष 1 महिने 17 दिवसांचा अनुभव असलेली आहे. अपघातग्रस्त विमान उत्तर प्रदेश सरकारचं होतं. या विमानाला अलाहाबादमध्ये 2013 मध्ये अपघात झाला होता. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने या विमानाची 2014 मध्ये मुंबईतील यूवाय एव्हिएशनकडे विक्री केली होती. या कंपनीने अलाहाबादमधील अपघातामुळे विमानाला झालेला बिघाड दुरुस्त केला. कसा झाला चार्टर्ड विमानाचा अपघात? यू वाय एव्हिएशन - हवाई वाहतुकीचा अनुभव - यू वाय एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी - हवाई वाहतुकीतली नवखी कंपनी - 11 मे 2015 ला कंपनीची स्थापना - 4 वर्षे,1 महिना 17 दिवस इतकाच अनुभव - उमंग कोठारी, दीपक कोठारी, उदय कोठारी कंपनीचे संचालक - कंपनीचं भांडवल : 10 कोटी

घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, महिला पायलटसह 5 जणांचा मृत्यू

दरम्यान, घाटकोपरमध्ये सर्वोदय रुग्णालयाजवळ चार्टर्ड विमान कोसळलं. या दुर्घटनेत पायलट, को पायलट, तंत्रज्ञ आणि रस्त्यानवरून जाणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. तर 21 वर्षांचा लवकुश कुमार आणि 24 वर्षांचा नरेश कुमार निशाद हे दोन तरुण जखमी झालेत. सर्वोदय लेनजवळ बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर हे विमान पडलं. पण ज्यावेळी विमान पडलं त्यावेळी दुपारच्या जेवणासाठी कामगार गेले होते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. विमान पडल्यानंतर संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आलाय.हे चार्टर्ड विमान जुहू येथून टेस्टिंगसाठी निघालं होतं. मुळात उत्तर प्रदेश सरकारचं असलेलं हे विमान मुंबईतल्या यूवाय एविएशनला विकण्यात आलं होतं. या आधीही या विमानाला अलाहाबादमध्ये अपघात झाला होता, अशी माहिती उत्तर प्रदेशचे प्रधान सचिव अवनीश अवस्थी यांनी दिलीय.
First published:

Tags: Accident, Charterd, Ghatkopar plane crash, Ghatkoper, Plane crash, घाटकोपर, चार्टर्ड विमान, प्लेन क्रॅश, विमान अपघात

पुढील बातम्या