मुंबई, 28 जून : घाटकोपरमध्ये सर्वोदय रुग्णालय परिसरात जीवदया नगरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलंय. ज्या वेळी हे विमान कोसळलं त्याचा धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलंय.
घाटकोपर पश्चिम परिसरात जागृती पार्क जवळ जीवदया लेनमध्ये माणिकलाल परिसरात बांधकाम सुरू असलेल्या परिसरात हे चार्टर्ड विमान कोसळलं. पोलीस प्रशासन, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली.
कसा झाला चार्टर्ड विमानाचा अपघात?
माणिकलाल परिसरात नजीकच एक इमारत होती. या इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून एक व्हिडिओ रेकाॅर्ड झालाय. हे विमान थेट रस्त्यावर उतरलं आणि एका कारवर आदळली आणि स्फोट झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Charterd, Chartered Aircraft Crash, Chartered Plane Crashes, Ghatkopar, Ghatkopar plane crash, Ghatkoper, Mumbai, Mumbai Plane Crash, NewsTracker, Plane crash, Uttar pradesh