Home /News /news /

कंगनाच्या अडचणी वाढणार, ड्रग्जसंदर्भात मुंबई पोलिसांना कसून चौकशीचे आदेश

कंगनाच्या अडचणी वाढणार, ड्रग्जसंदर्भात मुंबई पोलिसांना कसून चौकशीचे आदेश

कंगनाही घेत होती का ड्रग्ज? तपासासाठी मुंबई पोलिसांना कसून चौकशीचे आदेश

    मुंबई, 11 सप्टेंबर : महाराष्ट्र सरकारच्या आदेशानंतर आता मुंबई पोलिसाही कंगनाचा ड्रग्जशी काही संबंध आहे का यावर चौकशी करणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. कंगना रनौतचा ड्रग्ज प्रकरणाशी काही संबंध आहे का? याची चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आले होते. पण त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी तिच्याविरूद्ध अंमली पदार्थांच्या दुव्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यासंबंधी महत्त्वाची माहिती मुंबई पोलिसांनी CNN-NEWS18 शी बोलताना दिली. याआधी कंगनाने कधी ड्रग्सचे सेवन केले आहे का? याचा शोध आता मुंबई पोलीस करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता अध्ययन सुमनसोबत रिलेशनशिपमध्ये असताना 2016 मधल्या एका मुलाखतीमध्ये त्याने सांगितलं होतं की, कंगना मादक पदार्थांचं सेवन करते. इतकंच नाही तर ती ड्रग्ज घेण्यासाठी मलाही भाग पाडते असंही त्याने म्हटलं होतं अशी माहिती महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस आता याचा कसून तपास करणार आहे. पुढच्या 4-8 दिवसांत पुण्यात परिस्थिती बिघडू शकते, पालिकेकडून धक्कादायक खुलासा आता मुंबई पोलिस या प्रकरणात अधिक लक्ष घालणार आहेत. त्यामुळे कुठेतरी कंगनाच्या अडचणी वाढल्या असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान, एकीकडे कोरोना तर दुसरीकडे कंगना विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला आहे. मुंबई पालिकेने कंगनाच्या कार्यालयाचा काही भाग बेकायदेशीर असल्याचे सांगत तोडला. त्यानंतर अद्यापही कंगनाचं ट्विटरयुद्ध सुरूच आहे. ती वारंवार मुंबई पालिका आणि शिवसेनेविरोधात वक्तव्य करीत आहे. यावर कंगनाने आपल्या उद्धवस्त झालेल्या कार्यालयाला भेट दिली. यामध्ये तिला मोठं नुकसान झालं असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर कंगनाने पुन्हा एक ट्विट केलं होतं. India-China Faceoff: LACवर तणाव कमी करण्यासाठी भारत-चीनमध्ये 5 मुद्द्यांवर सहमती त्यामध्ये तिने लिहिलं होतं की - 15 जानेवारीला मी माझ्या कार्यालयाचं उद्घाटन केलं होतं. त्यानंतर कोरोनाच्या महासाथीने सर्वच ठप्प केलं. इतरांप्रमाणे या दिवसात माझ्याकडेही काम नव्हतं. त्यामुळे सध्या या कार्यालयाची दुरुस्ती करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. मी अशाच परिस्थितीत इथे काम करणार..माझं हे कार्यालय जगात स्वत: उभं राहू पाहणाऱ्या महिलांचं प्रतिक असेल. कंगनाचे हे ऑफिस याच वर्षात जानेवारीमध्ये तयार झालं होतं. याची किंमत 48 कोटींपेक्षाही जास्त आहे. मे महिन्यात तब्बल 64 लाख लोकांना झाला कोरोना, ICMR चा धक्कादायक खुलासा गेल्या अनेक दिवसांपासून कंगना ट्विटरच्या माध्यमातून शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत आहे. कंगनाने काल पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. यानंतर अनेक शिवसैनिकांनी राग व्यक्त केला होता. यानंतर ठिकठिकाणाहून कंगनाच्या विरोधात निषेध केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. कंगनाच्या या पोस्टवर विविध प्रकारच्या कमेंट्स येत आहेत. अनेकांनी कंगनाचं कौतुक केलं आहे तर अनेकांनी कंगनाच्या या ट्विटला ड्रामा म्हटलं आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Kangana ranaut, Shivsena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या