पुणे, 11 सप्टेंबर : महाराष्ट्रात coronavirus चं थैमान सुरू आहे. गुरुवारी कोरोना रुग्णांच्या रोजच्या वाढत्या संख्येनं नवा विक्रम केला आहे. एकट्या पुणे शहरात 2969 नवे रुग्ण सापडले. पिंपरी चिंचवड परिसरात 1168 नवे रुग्ण सापडले. त्याखालोखाल मुंबई आणि ठाण्यात रुग्णवाढीने कहर केला आहे. राज्यात 10 सप्टेंबरच्या सरकारी आकडेवारीनुसार 23,446 नवे रुग्ण 24 तासांत दाखल झाले आहेत त्यामुळे आता पुणेकरांची चिंता वाढली आहे. अशात शहरात पॉझिटिव्ह रुग्णांचा दर अर्थात बाधित दर 28 टक्के झाला असून बाधित रुग्णांच्या संख्येने उचल खाल्ली आहे.
पॉझिटिव्ह दर हा 5 टक्केच्या खाली असणं अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत आकडा वाढतो आहे. हा आकडा कमी न झाल्यास 4-8 दिवसांत पुण्यात स्थिती बिघडू शकते अशी भीती महापालिककेने व्यक्त केली आहे. अत्यवस्थ रुग्ण संख्या कमी होत नसल्याने icu ,ऑक्सिजन बेड्सची गरज भासत आहे. अशात व्हेंटिलेटर बेड्सची कमतरता तर आधी पासूनच आहे. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
India-China Faceoff: LACवर तणाव कमी करण्यासाठी भारत-चीनमध्ये 5 मुद्द्यांवर सहमती
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या रोज साडेसहा हजार नागरिकांच्या चाचण्या होत आहेत. पालिका आयुत विक्रम कुमार यांनी मास्क न वापरणाऱ्यांवर आणि रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर अधिक कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. पण असं असलं तरी रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे पुण्यात कोरोना हाताबाहेर जातो की काय अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्याने कोरोना रूग्णसंख्येचा 2 लाखांचा टप्पा पार केल्याने पुणेकर आता कोरोनाच्या साथीत देशात नंबर 1 झाले आहेत. अर्थात ही काही भुषणावह बाब नाही. अगदी मुंबई आणि दिल्लीसारख्या महानगरांनाही पुणेकरांनी मागे टाकलं आहे. त्यामुळे पुणेकर नेमके चुकले कुठे? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
मे महिन्यात तब्बल 64 लाख लोकांना झाला कोरोना, ICMR चा धक्कादायक खुलासा
देशात पहिला रूग्ण हा खरंतर केरळ राज्यात सापडला. महिन्याभराने म्हणजेच 9 मार्चला राज्यातला पहिला कोरोना रुग्ण हा पुण्यातच आढळून आला. त्यानंतर 22 मार्चपासूनच पुण्यात लॉकडाऊनही सुरू झालं ते अगदी मे अखेरपर्यंत सुरू होतं. पण आजमितीला सहा महिन्यांचा आढावा घेतला तर कोरोनाच्या बाबतीत हाच पुणे जिल्हा देशात नंबर वन झाला आहे. गेल्या सोमवारीच पुणे जिल्ह्याने 2 लाखांचा तर पुणे शहराने 1 लाखांचा टप्पा पार केला आहे.
मराठा आरक्षण: CM उद्धव ठाकरे यांनी ठरवली रणनीती, आंदोलकांशीही चर्चा करणार
खरंतर दहा दिवसांच्या लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम म्हणून मध्यंतरी पुणे शहरातील दैनंदिन कोरोना रूग्णांच्या संख्या अगदी हजार - बाराशे पर्यंत खाली आली होती. पण गणेशोत्सवात पुणेकर पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं बाहेर पडले आणि हाच दैनंदिन रूग्ण वाढीचा आकडा पुन्हा एकदा दोन हजारांवर जाऊन पोहोचला असून हीच पुणेकरांच्या दृष्टीने सर्वाधिक चिंतेची बाब आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.