नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S Jaishankar) आणि चीनी समकक्ष वांग यी (Wang Yi) यांनी पूर्व लडाखमधील (East Ladakh) वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) गेल्या कित्येत दिवसांपासून सुरू असलेला गतिरोध संपवण्यासाठी गुरुवारी मॉस्को इथं चर्चा केली. सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि दोन्ही देशांद्वारे सैन्य वाढवण्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली. मिळालेल्या माहितीनुसार, किमान दोन तास दोन्ही नेत्यांमधील संभाषण सुरू होतं. सीमेवरील तणाव कमी करणे आणि गतिरोधकाच्या ठिकाणाहून सैन्य काढून घेणं हे या चर्चेचं एकमेव लक्ष्य होतं.
परराष्ट्र मंत्रालयाने या दोन्ही नेत्यांच्या बैठकीनंतर एक निवेदन जारी केलं आणि त्यात म्हटलं आहे की, हा 5 कलमी करार झाला आहे. यामध्ये दोन्ही देशांमधील संबंधात कोणत्याही मतभेदांमुळे वाद होऊ नये असं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी (Wang Yi) यांनी कबूल केलं असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर मॉस्को इथे झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी सीमेवर शांतता आणि सद्भाव कायम ठेवण्यावर सहमती दर्शवली आहे.
मे महिन्यात तब्बल 64 लाख लोकांना झाला कोरोना, ICMR चा धक्कादायक खुलासा
सोबतच हे दोन्ही देश वाटाघाटीद्वारे सीमा विवाद सोडवणार यावरही सहमती दर्शवण्यात आली आहे. एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर चर्चा सुरूच राहिल , असंही दोन्ही देशांनी ठरवलं असल्याची माहिती समोर येत आहे.
भारत आणि चीनच्या मॉस्को इथं बैठकीनंतर चिनी परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, अतिशय महत्त्वाच्या अशा चर्चेनंतर दोन्ही बाजूंच्या सद्यस्थितीबद्दल 5 कलमांवर एकमत झालं आहे. 'हे दोन शेजारी देश असल्याने चीन आणि भारत यांच्यात काही विषयांवर मतभेद असणं स्वाभाविक आहे. पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते मतभेद योग्य दृष्टीकोनात आहेत' असं चिनी परराष्ट्र मंत्रालयाकडून म्हटलं गेलं आहे.
कोरोना लॉकडाऊनमध्ये जगभरात शाळा सुरू झाल्यानंतर कशी आहे तिथली परिस्थिती पाहा
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी झालेल्या भेटी दरम्यान परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी स्पष्ट केलं की सीमाभागांच्या व्यवस्थापनावरील सर्व करारांचे पूर्णपणे पालन करणं आणि एकतर्फी स्थितीत बदल करणं अपेक्षित आहे. कोणत्याही चुकीच्या प्रयत्नांचं समर्थन केलं जाणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.