Home /News /news /

मुंबई सोडताच कंगनाचं ट्वीट, 'यावेळी वाचले नाहीतर सोनिया सेनेमुळे मुंबई असुरक्षित'

मुंबई सोडताच कंगनाचं ट्वीट, 'यावेळी वाचले नाहीतर सोनिया सेनेमुळे मुंबई असुरक्षित'

मुंबईत आता आधीसारखी सुरक्षा नाही राहिली असं लिहित यासाठी तिने शिवसेनेला सोनिया सेना असं म्हणत ट्वीट केलं आहे.

    मुंबई, 14 सप्टेंबर : शिवसेनेसोबत बराच वाद रंगल्यानंतर चित्रपट अभिनेत्री कंगना रणौत मुंबईहून चंदीगडला पोहोचली आहे. सोमवारी सकाळी कंगना मनालीला रवाना झाली. त्यादरम्यान चंदीगडला पोहोचल्यानंतर तिने पुन्हा एकदा ट्विट करत शिवसेनेवर हल्ला केला आहे. मुंबईत आता आधीसारखी सुरक्षा नाही राहिली असं लिहित यासाठी तिने शिवसेनेला सोनिया सेना असं म्हणत ट्वीट केलं आहे. कंगनाने तिच्या ट्विटमध्ये लिहलं की, 'चंदीगडमध्ये उतरताच माझे सुरक्षा फक्त नावाला राहिली होती. लोक आनंदाने मला शुभेच्छा देत होते. यावेळी मी वाचले असं वाटतं. ज्या मुंबईत आईच्या कुशुतली शितलता मिळत होती ती मुंबई आता नाही राहिली. आता तो दिवस आहे जिथे जीव वाचला तर सगळं काही आहे. शिवसेनेची सोनिया सेना होणाऱ्या मुंबईत दहशतवादी प्रशासनाचा बोल बाला. कोरोनाचा विस्फोट होताना पुणेकरांची एक चूक नडणार, धोका वाढला तरी मास्क हनुवटीवरच दरम्यान, मुंबईतून निघतानाही कंगनाने शिवसेनेविरोधात ट्वीट केलं होतं. शिवसेनेनं आपल्या मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून कंगना राणावतवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून सल्लावजा टोला लगावला होता. राऊतांच्या या टीकेला आज कंगना राणावतने ट्वीट करून पलटवार केला आहे. जेव्हा रक्षकच हे भक्षक झाल्याचे दाखवत आहे, त्यामुळे तेच लोकशाहीचे चीरहरण करत आहे. मला कमजोर समजून त्यांनी मोठी चूक केली आहे, असा पलटवार कंगनाने सेनेवर केला आहे. ...अन् पत्नीनं स्वत: काढून दिलं गळ्यातलं मंगळसूत्र, उपासमारीचं भीषण वास्तव तसंच, त्यांना वाटलं मी एक महिला आहे. घाबरून जाईन. पण मला भीती घालवून त्यांनीच आपली प्रतिमा धुळीस मिळवली आहे, अशी टीकाही कंगनाने केली. दरम्यान, रविवारी संध्याकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता शिवसेना या विषयावर बोलणार नाही अशी भूमिका घेतली आहे. हा विषय आमच्यासाठी बंद झाल्याचंही स्पष्ट केले.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Bollywood, Congress, Kangana ranaut, Shivsena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या