बीड, 14 सप्टेंबर : महाराष्ट्राची लोककला जपणाऱ्या खानदानी कलाकारांवर उपास मारीची वेळ आली आहे. आश्वासन देऊन पोट भरत नाही हो प्रत्यक्ष मदत करा अशी आर्त हाक बीड जिल्ह्यातील गोंधळी आणि डवरी समाजाने दिली आहे. घरात काही खायला नाही म्हणून मंगळसूत्र मोडून कुटुंब जगवायची वेळ कलाकारावर आली आहे. बीड जिल्ह्यातील लिंबागणेश गावातील शाहीर विठ्ठल काटे यांच्या शाहिरीने अवघ्या महाराष्ट्राला भुरळ पाडली होती. याच लोक कलावंतांच्या कुटुंबातील खानदानी कलावंतावर आज जी वेळ आली ती पाहून तुमच्यादेखील डोळ्यांत पाणी येईल. कोरोनाच्या संकटात गेल्या 7 महिन्यांपासून कार्यक्रम बंद आहेत. लग्न सोहळे होत असले तरी जागरण गोंधळ करायला कोणीही धजावत नाही. शाहिरीचे कार्यक्रम तर सोडाच साधा गावामध्ये फिरता येत नाही. यामुळं जागरण गोंधळ, नाटक आणि शाहिरीवरती पोट असणाऱ्या या गावातील 10 कुटुंबावर मंगळसूत्र मोडून कसाबसा उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे. आजोबा, पणजोबा, वडील, आज आम्ही आणि उद्या आमची मुलं ही देखील ही कला जोपासण्याचं काम करत आहेत. मात्र शासनाने दिलेल्या मदतीवरच आमचं कुटुंब अवलंबून असतं. पण यावर्षी मात्र सर्व मोडकळीस आलं आहे असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर वाढले, चांदीही महागली; वाचा आजचे दर लिंबा गणेश मधील जागरण गोंधळ पार्टी मधील विलास विठ्ठल काटे यांच्या कुटुंबात 5 माणसं आहेत. अपंग बहीण तिचा वैद्यकीय खर्च आणि कुटुंबाची जबाबदारी एकट्या विलास यांच्यावर आहे. विलासराव हे उत्तम संबळ वादक आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देखील मिळाला आहे. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून कार्यक्रम बंद असल्याने कुटुंब चालवायच कसं हा त्यांच्या समोर खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे विलास यांनी पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र मोडून चार महिने कसं बसं घर चालवलं. मायबाप सरकार कलाकारांना तुम्हीच मदत करा अशी मागणी त्यांनी केली. दुसरीकडे, पती विलाससोबत गोंधळाच्या कार्यक्रमात जाणाऱ्या सुनंदा या देखील या चिंतेत आहेत. घरात खाणारी तोंडं जास्त आहेत आणि कमावणारे हात बंद पडलेत. यामुळे मी स्वतः मंगळसूत्र काढून नवऱ्याच्या हातात दिलं. त्यावरच आमचं आज कुटुंब चालतं आहे असं सांगताना सुनंदाच्या डोळ्यात पाणी आलं. मुंबई पालिकेची मोठी कारवाई, मृतदेह अदलाबदल प्रकरणात 2 कर्मचाऱ्यांना केलं निलंबित याच समाजातील अशोक काटे यांच्या घरामध्ये तर धान्याचे डबे रिकामे झाले आहेत. घरामध्ये मुलगी बाळंतपणासाठी आलेली तिला परत सासरी बोळवण करून पाठवायचं. यातच घरात काय खायला नाही नाटक कंपनीमध्ये काम करत असताना कधी राजाचा तर कधी प्रधानाची वेशभूषा रंगुन लोकांना हसायला लावणार्या या कलाकारावर आज उपासमारीची वेळ आली. कलाकाराचा रुबाब फक्त स्टेजवरच असतो, खाली उतरल्यानंतर काहीच नाही, शेतात काम करायला गेला तर काम होत नाही आणि कामही कोणी देत नाही. त्यामुळे सरकरने मदत करावी अशी खंत अशोक काटे यांनी बोलून दाखवली. ‘कोणाचा बँड वाजतो तर कोणाचा ब्रँड….’ ‘ठाकरे’ब्रँड वरून मनसेची जहरी टीका यामुळे लोककलावंतांना जगवण्यासाठी शासनाने मदत करायला हवी तर समाजातील दानशूर लोकांनी कलाकाराच्या कुटुंबाला जगवणं मदतीचा हात देणे ही माणुसकीची गरज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.