कोरोनाचा विस्फोट होत असताना पुणेकरांची एक चूक नडणार, धोका वाढला तरी मास्क हनुवटीवरच

या पार्टिशनमुळे प्रवासी आणि रिक्षा चालकांना सुरक्षित प्रवास करता येणार आहे. याशिवाय सेफ्टी किट्स म्हणजेच फेस मास्क, हँड सॅनिटायझर, वाहन डिसइन्फेट करण्याचं द्रव्य या 1 लाख रिक्षा चालकांना देण्यात येणार आहे.

कुणी तोंडाला मास्कच लावलेला नाही तर कुणी जस्ट चहा पिलो म्हणून मास्क काढला, अशा घटना समोर येत आहे. यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.

  • Share this:
पुणे, 14 सप्टेंबर : प्रत्येक क्षणाला कोरोनाचा धोका वाढतोय. पण पुणेकर याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. दिवसेंदिवस कोरोनाची आकडेवारी वाढत असताना पुण्यातून एक चिंतेची बाब समोर आली आहे. लॉकडाऊनचे सगळे नियम मोडत मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर येत आहेत. सगळी दुकानं आणि बाजारपेठा सुरू झाल्या असल्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर मोठी गर्दी करायला सुरुवात केली आहे. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे यावेळी सोशल डिस्टंसिंग आणि मास्कचे सगळे नियम पायदळी तुडवले. पुण्यात नागरिक मास्क वापरत नसल्याचं समोर आलं आहे. कोणी फळभाज्या विकताना तर कुणी दर सांगत ओरडताना तर कुणी विकत घेताना मास्क खाली करून भाव करत आहेत. कुणी तोंडाला मास्कच लावलेला नाही तर कुणी जस्ट चहा पिलो म्हणून मास्क काढला, अशा घटना समोर येत आहे. यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. ...अन् पत्नीनं स्वत: काढून दिलं गळ्यातलं मंगळसूत्र, उपासमारीचं भीषण वास्तव मास्क लावण्याच्या नाना तऱ्हा आणि न लावण्याचे किंवा नीट न लावण्याचे नाना बहाणे पुणेकर करत असल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरू शकतो. आधीच सर्वाधिक कोरोना रुग्ण पुण्यातच आहेत. त्यामुळे पुणेकरांनी जर असाच निश्काळजीपणा केला तर परिस्थिती आणखी भीषण होऊ शकते. त्यामुळे अर्थातच पुणे तिथं काळजी उणे असं म्हणण्याची वेळ आली. खरंतर, मास्क न वापरण्यावर पुण्यात दंड आकारला जातो. पण याचा नागरिकांवर कोणताही परिणाम झाल्याचं दिसत नाही. मास्क न घातल्याने पुणे शहर आणि ग्रामीण भागात कोट्यवधी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानक आणि बाहेर चौकात फेरफटका मारला तर मास्क घालणारे लोक दिसतात. पण थोडा वेळ गेला की मास्क काढून हनुवटीवर लावून लोकं फिरताना दिसत आहेत. 'कोणाचा बँड वाजतो तर कोणाचा ब्रँड....' 'ठाकरे'ब्रँड वरून मनसेची जहरी टीका पुणेकरांनो, कोरोना या जीवघेण्या आजारामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. या संसर्गावर लस शोधण्यासाठी अवघं जग प्रयत्न करत आहे. पण आपलं आरोग्य आपण सांभाळणं आणि निरोगी राहणं हीच कोरोनाची खरी लस आहे हे विसरू नका. स्वच्छ राहा, रस्त्यावर थूंकू नका आणि मास्क वापरा याने कोरोनाचा धोका टाळण्यात मोठा हातभार होईल.
Published by:Renuka Dhaybar
First published: