जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / कल्याण डोंबिवलीकरांसाठी GOOD NEWS, प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

कल्याण डोंबिवलीकरांसाठी GOOD NEWS, प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

भारत बायोटेक (Bharat Biotech) ची Covaxin आणि झाइडस कॅडिलाची ZyCoVD च्या दोन कंपन्या आणि सिरमचं काम प्रगती पथावर आहेत.

भारत बायोटेक (Bharat Biotech) ची Covaxin आणि झाइडस कॅडिलाची ZyCoVD च्या दोन कंपन्या आणि सिरमचं काम प्रगती पथावर आहेत.

कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर वैद्यकीय चाचणीकरिता मुंबईवर आधारित राहावे लागणाऱ्या कल्याण डोंबिवलीकरांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

डोंबिवली, 23 एप्रिल : कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर वैद्यकीय चाचणीकरिता मुंबईवर आधारित राहावे लागणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला आता स्वतंत्र लॅब मिळणार आहे. त्यामुळे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कोविड-19 चाचणी करुन लवकरात लवकर टेस्ट रिपोर्ट मिळण्यास मदत होणार आहे. कोरोना अर्थात कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन आटोकाट प्रयत्न करत असतानाच कोरोनाची तपासणी अधिकाधिक संख्येने व्हावी, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीसाठी स्वतंत्र तपासणी लॅब असावी, यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पाठपुरावा करत होते. या पाठपुराव्याला यश आले असून पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी करोना तपासणीची स्वतंत्र लॅब उभारण्यासाठी निधी देण्यास मंजुरी दिली आहे. हेही वाचा -  हॉटस्पॉट झाले कमी पण धोका कायम; राज्याचं लक्ष आता या 5 धोकादायक केंद्रांकडे कोरोना तपासणी लॅबची संख्या सध्या मर्यादित असून उपलब्ध लॅब्जवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. कल्याण-डोंबिवलीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येत असून इथे स्थानिक पातळीवर लॅब असणे आवश्यक आहे. सध्या संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी मुंबई येथील केईएम रुग्णालय आणि जेजे रुग्णालयात पाठवावे लागत असून त्याचा अहवाल येण्यास वेळ लागत असल्यामुळे उपचारांमध्ये अडचणी येत आहेत. हेही वाचा -  लॉकडाऊनमध्ये पार्टी केल्याचा आरोप, अभिनेत्री अनिता राजच्या घरी पोहोचले पोलीस त्यामुळेच कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना तपासणीची स्वतंत्र लॅब असावी, यासाठी खा. डॉ. शिंदे प्रयत्नशील होते. अशा प्रकारच्या लॅबसाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन योजनेतून देण्याची मागणी त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली होती. ही मागणी नार्वेकर यांनी मान्य केली असून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने आता सदर लॅबचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला जाणार असल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले. हेही वाचा - लॉकडाऊनमध्ये पार्टी केल्याचा आरोप, अभिनेत्री अनिता राजच्या घरी पोहोचले पोलीस दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत टेस्टिंग लॅब असावी अशी मागणी 29 मार्चला मनसे आमदार राजू पाटील यांनी केली होती. जिल्हाधिकारी यांनी मागणी मान्य करत जिल्हा नियोजन योजने मार्फत या लॅबची उभारणी करण्यात येणार आहे, असे मनसे आमदार राजू पाटील यांनी आपल्या ट्वीटरद्वारे सांगितलं आहे. तर यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे आभार सुद्धा मानले आहे. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात