जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / नवलच! चक्क मेलेल्या उंदरांपासून बनवतो शोभेच्या वस्तू; दुकानाबाहेर ग्राहकांची झुंबड

नवलच! चक्क मेलेल्या उंदरांपासून बनवतो शोभेच्या वस्तू; दुकानाबाहेर ग्राहकांची झुंबड

नवलच! चक्क मेलेल्या उंदरांपासून बनवतो शोभेच्या वस्तू; दुकानाबाहेर ग्राहकांची झुंबड

नवलच! चक्क मेलेल्या उंदरांपासून बनवतो शोभेच्या वस्तू; दुकानाबाहेर ग्राहकांची झुंबड

Strange Business of Man : जगात विविध प्रकारचे लोक आहेत आणि प्रत्येकजण आपापल्या परिने काम निवडतो आणि त्यामाध्यमातून पैसे कमावतो. ब्रिटनमध्ये कसाई असलेल्या एका व्यक्तीनेही असाच व्यवसाय सुरू केला आहे. मेलेल्या जनावरांच्या कातडीपासून तो कारच्या सजावटीच्या वस्तू बनवतो आणि लोकही हौसेने खरेदी करतात. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय त्याने स्वतःहून हा अनोखा व्यवसाय सुरू केला असून या माध्यमातून तो बक्कळ कमाई करत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

Strange Business of Man :  जगामध्ये क्रिएटिव्ह लोकांची काही कमी नाही. कोण काय कलाकारी करेल याचा नेम नाही. कधीकधी एखादी व्यक्ती गंमत म्हणून एखादी गोष्ट करते आणि पुढे त्याच गोष्टी त्याची ओळख बनतात. जगातील असे अनेक लोक आपण पाहिले असतील. हे लोक असे काम निवडतात की आपणही आश्चर्यचकीत होतो. परंतु हे लोक त्यामाध्यमातून बक्कळ पैसे कमावतात. ब्रिटनमध्ये कसाई असलेल्या एका व्यक्तीनेही असाच व्यवसाय सुरू केला आहे. मेलेल्या जनावरांच्या कातडीपासून तो कारच्या सजावटीच्या वस्तू बनवतो आणि लोकही हौसेने खरेदी करतात. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय त्याने स्वतःहून हा अनोखा व्यवसाय सुरू केला असून या माध्यमातून तो बक्कळ कमाई करत आहे. ब्रिटनमधील जॅक डेव्हनी (Jack Devaney) याचा एक विचित्र व्यवसाय आहे (Man makes car ornaments out of dead animals) मृत प्राण्यांच्या त्वचेपासून कारचे डँगलर आणि इतर सजावटीच्या वस्तू बनवतो. यामध्ये तो फर वस्तू बनवतो आणि विकतो. हेही वाचा:  VIDEO: लग्नाचा अतिउत्साह पडला महागात, नवरदेवाला बसला 2 लाखांचा फटका लोकांना उत्पादने आवडतात- प्लायमाउथ (Plymouth) येथील रहिवासी असलेल्या जॅक डेव्हानी याचा अनोखा व्यवसाय लोकांमध्ये लोकप्रिय झाला आहे. प्लायमाउथ हेराल्डच्या रिपोर्टनुसार, 28 वर्षीय जॅकचे उत्पादन काहींना आवडते, तर काहींना ते वाईट वाटते. तो शक्यतो कारमध्ये टांगण्यासाठी केसाळ डँगलर बनवतो. त्यासाठी तो पाळीव प्राण्यांच्या दुकानामधून कच्चा माल घेतो. त्याच्या संग्रहात विचित्र वस्तू आहेत. रॅबिट टोस्टर, रॅट पेन्सिल केस आणि माईस इअरिंग्ज त्यापैकी एक आहेत. हेही वाचा:  भारतातील उलटं फिरणारं घड्याळं; ‘या’ समुदायाच्या घड्याळांमध्ये 12 नंतर 11 वाजतात डेंगलर सर्वात प्रसिद्ध- जॅकने प्लायमाउथ विद्यापीठातून थ्रीडी डिझाईन कोर्स केला आहे. येथून त्याने मृत जनावरांचे जतन करण्याचे काम सुरू केले. त्याची पहिली निर्मिती चुकून झाली आणि नंतर त्याने त्याला आपला नवीन व्यवसाय बनवला. त्याने उंदराच्या कातडीत काही स्टफ बनवले आणि ते ऑनलाइन व्हायरल झाले. 14 ते 20 या वर्ष कसाई म्हणून काम करणारा जॅक सांगतो की लहानपणी तो असा नव्हता. मात्र, नंतर त्यांनी याच कामाला आपला व्यवसाय बनवला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात