जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO: लग्नाचा अतिउत्साह पडला महागात, नवरदेवाला बसला 2 लाखांचा फटका

VIDEO: लग्नाचा अतिउत्साह पडला महागात, नवरदेवाला बसला 2 लाखांचा फटका

VIDEO: लग्नाचा अतिउत्साह पडला महागात, नवरदेवाला बसला 2 लाखांचा फटका

य़ा घटनेचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

Groom Dance on Cars Roof: लखनऊ, 18 जून : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) एका नवरदेवाला (Groom) आपल्या लग्नात तब्बल दोन लाखांचा दंड भरावा लागला. ही बाब अनेकांसाठी हैराण करणारी असेल. मिळालेल्या माहितीनुसार, तो आपल्या वरात घेऊन लग्नाच्या मंडपाच्या दिशेने जात होता. 13 जून रोजी नवरदेव कारच्या छतावर बसून डान्स करीत असल्याचा व्हिडीओ (Social Media) सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरदेव आपल्या महागड्या कारच्या खुल्या छतावर डान्स करीत आहे. या घटनेची दखल घेत वाहतूक पोलिसांनी कारवाई करीत थेट 2 लाखांची पावती फाडली. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ऑडी गाडीतून निघालेला नवरदेव मुजफ्परनगर-हरिद्वार मार्गावर स्टंट करीत जात होता. मुजफ्परनगर येथील गर्दीच्या ठिकाणी नवरदेव ऑडी कारच्या खुल्या छतावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आणखीही बरेच पाहुणे कारच्या खिडकीला लटकताना दिसत आहेत.

जाहिरात

एकूण 9 कारना बसला 2 लाखांचं दंड… यादरम्यान एका व्यक्तीने लग्नापूर्वीचा हा सर्व प्रकार आपल्या मोबाइलमध्ये कैद केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. याशिवाय त्याने स्थानिक पोलिसांना टॅग करीत ट्विटदेखील केलं. ज्यानंतर स्थानिक पोलिसांनी कारवाई सुरू केली. या वरातीतील एकूण 9 कारवर कारवाई केली.

जाहिरात

अंकित कुमार नावाच्या एका ट्विटर युजरने ही व्हिडीओ क्लिप (Video Clip) आपल्या ट्विटर हँडलवरुन (Twitter Handle) शेअर केली. या कृत्यामुळे इतक नागरिकांचा जीव धोक्यात घातला जात आहे. यावर पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात