Home /News /viral /

भारतातील उलटं फिरणारं घड्याळं; 'या' समुदायाच्या घड्याळांमध्ये 12 नंतर 11 वाजतात

भारतातील उलटं फिरणारं घड्याळं; 'या' समुदायाच्या घड्याळांमध्ये 12 नंतर 11 वाजतात

गोंडवाना टाईमच्या घड्याळांना गोंड समुदायाव्यतिरिक्त आणखी 29 समुदायाचे लोकही मानतात. आदिवासींचं म्हणणं आहे, की निसर्गाचं चक्र ज्या दिशेने फिरतं, त्याच दिशेने त्यांचं घड्याळही आहे.

मुंबई, 18 जून : आपला देश हा विविध परंपरा, संस्कृतींनी नटलेला आहे. प्रत्येक समुदायाच्या चालीरिती या वेगवेगळ्या असतात. कित्येक वेळा इतरांसाठी साधी असणारी गोष्टही काही विशिष्ट समुदायांच्या लोकांसाठी चुकीची किंवा निषिद्ध असू शकते. छत्तीसगड राज्यात असलेल्या एका समुदायामध्ये चक्क घड्याळंच उलट्या (Anti-clockwise clock) दिशेने चालतं. साधारणपणे जगातील सर्व घड्याळांमध्ये 12 वाजेनंतर 1 वाजतात. मात्र, या समुदायाच्या घड्याळांमध्ये 12 नंतर 11 वाजतात. छत्तीसगडमधील कोरबा गावाजवळ असणाऱ्या गोंड आदिवासी समुदायामध्ये (Gond Tribe) अशा प्रकारची घड्याळे वापरली जातात. हा समुदाय आदिवासी शक्तीपिठाशी निगडीत आहे. आपल्याला माहिती आहे, की जगभरातील घड्याळांचे काटे हे डावीकडून उजवीकडे जातात. मात्र, या गोंड समुदायाच्या गावातील घड्याळांचे (Gond tribe clocks) काटे उजवीकडून डावीकडे जातात. यांच्या गावातील सर्व घड्याळं अशीच आहेत. हीच घड्याळं बरोबर असल्याची या लोकांची मान्यता आहे. मदतीसाठी ओरडणाऱ्या महिलेचा आवाज ऐकून पोलिसांनी तोडला दरवाजा, घरात दिसलं भलतंच दृश्य निसर्गाशी संबंधित आहे कारण या आदिवासींचं म्हणणं आहे, की त्यांचं घड्याळच बरोबर आहे. या घड्याळाचं नाव त्यांनी गोंडवाना टाईम (Gondwana time) ठेवलं आहे. आपली पृथ्वी ही उजवीकडून डावीकडे फिरते. तसंच, चंद्र, तारे आणि सूर्याची फिरण्याची दिशादेखील हीच आहे. एखाद्या तलावात जेव्हा भोवरा तयार होतो, तेव्हा त्याची दिशाही उजवीकडून डावीकडे असते. त्यामुळेच या लोकांनी घड्याळाची दिशाही अशीच ठेवली आहे. याच कारणामुळे या समाजातील (Gond Tribe rules) लग्नातही वधू आणि वर अग्निला उजवीकडून डावीकडे अशा उलट्या फेऱ्या मारतात. हा समाज निसर्गाशी अगदी जोडलेला आहे. महुआ, परसा आणि इतर झाडांची ते पूजा करतात. 23 वर्षांची मुलगी अन् 22 राजेनामे! असा सुरु केला स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या विशेष बनवून घेतलं घड्याळ घड्याळाचे काटे उलट्या दिशेने फिरू लागले, तर कोणत्याही घड्याळात 12 वाजेनंतर 1 वाजण्याऐवजी 11 वाजतील. असं झाल्यामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गोंड आदिवासींपैकी काहींनी विशेष घड्याळं बनवून घेतली आहेत. या घड्याळांचे केवळ काटेच उलट्या दिशेने फिरत नाहीत, तर यात आकडेही (Gondwana tribe clock) उलटे आहेत. म्हणजेच, आपल्या घड्याळात 12 नंतर पुढे 1 येतं, मात्र गोंडवाना टाईमच्या घड्याळात 12 नंतर 11 येतं. घड्याळाचे काटे उलट दिशेने फिरत असल्यामुळे 12 नंतर एका तासाने काटा मागे जाऊन बरोब्बर 1 वर येतो. 30 समुदाय मानतात हेच घड्याळ गोंडवाना टाईमच्या घड्याळांना गोंड समुदायाव्यतिरिक्त आणखी 29 समुदायाचे लोकही मानतात. आदिवासींचं म्हणणं आहे, की निसर्गाचं चक्र ज्या दिशेने फिरतं, त्याच दिशेने त्यांचं घड्याळही आहे. छत्तीगडच्या या भागात सुमारे 10 हजार कुटुंबं राहतात. ही सर्व आदिवासी कुटुंबं याच प्रकारच्या घड्याळांना फॉलो करतात.
First published:

पुढील बातम्या