Home /News /news /

वुहानमध्ये नेमकं काय घडलं? जिथून कोरोना पसरला त्या शहराची काळी बाजू या 'डायरी'मध्ये

वुहानमध्ये नेमकं काय घडलं? जिथून कोरोना पसरला त्या शहराची काळी बाजू या 'डायरी'मध्ये

लॉकडाऊनच्या काळात चीनमध्ये नेमकं काय घडलं हे सांगणाऱ्या अशा काही गोष्टी लेखिका फांग फांग यांच्या डायरीमध्ये आहेत ज्यामुळे स्थानिकांकडून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत

  वुहान, 24 एप्रिल : कोरोना व्हायरस लॉकडाऊन (Coronavirus Lockdown) काळात चीनमध्ये जवळपास 70 दिवस वास्तव्यास असणाऱ्या फांग फांग (Fang Fang) या प्रतिष्ठित लेखिकेला धमक्यांना सामोरे जावे लागत आहे. फांग यांनी या काळात एक ऑनलाइन डायरी होती, ही डायरी इंग्रजी आणि जर्मन भाषेमध्ये देखील प्रसिद्ध होणार आहे. या डायरीमध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे स्थानिकांकडून फांग यांनी जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. वुहानमध्ये राहणाऱ्या फांग यांनी जवळपास 60 पोस्ट लिहिल्या होत्या. सोशल मीडियावर या पोस्ट खूप व्हायरल झाल्या होत्या. जेव्हा या पोस्ट डायरी स्वरूपात विदेशी भाषांमध्ये भाषांतरित केल्या जाणार असल्याची चर्चा सुरू झाली, त्यावेळी अनेक चिनी नागरिकांनी फांग यांना धमकवण्यास सुरूवात केली. त्यांचा पत्ता देखील सार्वजनिक करण्यात आला होता. लेखिका फांग फांग
  लेखिका फांग फांग
  (हे वाचा-'कोरोना कधी जीव घेईल काय माहित', डॉक्टर दाम्पत्यानं बनवलं लेकासाठी मृत्यूपत्र) फांग यांना धमक्या मिळायला लागल्याने त्यांच्या जर्मन प्रकाशनाने या पुस्तकासाठी बनवण्यात आलेलं वादग्रस्त मुखपृष्ठ देखील मागे घेतलं आहे. फांग यांनी या डायरीला 'वुहान डायरी: त्या शहराची निषिद्ध डायरी (Forbidden Diary) जिथून कोरोनाचे संकट सुरू झाले होते', असं नाव दिलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून फांग चीनमधील विविध विषयांवर लिखाण करत आहेत. 2010 मध्ये त्यांना चीनमधील सर्वात प्रतिष्ठित असा साहित्यिक पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता. काय आहे फेंग यांच्या डायरीत? लेखिकेने 25 जानेवारीपासून कोरोनाबाबत ही डायरी म्हणजेच ऑनलाइन पोस्ट लिहण्यास सुरूवात केली. त्यांची शेवटची पोस्ट 25 मार्च 2020 रोजी आली होती, जेव्हा चीनी सरकारने लॉकडाऊन संपवण्याची घोषणा केली. ज्या गोष्टींवर अद्याप पडदा आहे, ज्यांच्याबद्दल कुणीच बोलत नाही अशा गोष्टींचा समावेश त्यांच्या डायरीमध्ये होता. या काळात त्यांच्या आजुबाजुला काय घडलं, त्यांनी काय ऐकलं, काय भोगलं आणि स्थानिकांनी काय मतं दिली यांचा समावेश त्यांच्या पोस्टमध्ये होता. (हे वाचा-किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत सस्पेन्स कायम, 6 वर्ष अशी सुरू होती सर्जरीची तयारी) त्यातील एक पोस्ट खूप प्रसिद्ध झाली होती, त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्याठिकाणच्या स्थानिक स्मशानातील परिस्थिती त्यांनी रेखाटली होती. लेखिकेच्या एका डॉक्टर मित्राने तिला एक फोटो पाठवला होता ज्यामध्ये अनेक लोकांचे फोन बेवारस पडले होते. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे ते फोन होते. वुहानमधील हॉस्पिटलबद्दल लिहताना फेंग यानी त्याठिकाणच्या सरकारी आणि प्रशासकीय बंदोबस्ताबाबत लिहिलं होतं. रुग्णांना परत पाठवलं जायचं किंवा रुग्णालयातील मास्क संपले आहेत, अशा अनेक समस्यांबाबत फांग लिहीत होत्या. त्याचप्रमाणे एका निनावी डॉक्टराच्या हवाल्याने एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये कोरोना संक्रमित झाल्याचंही त्यांनी लिहिलं होतं. धमक्यांमुळे अकाउंट करावं लागलं बंद धमक्या मिळाल्यामुळे त्यांना त्यांच्या पोस्टमधील बराचसा मजकूर डिलिट करावा लागला. स्थानिक मीडिया Caijing  ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ही माहिती दिली. त्यांचे सोशल मीडिया अकाउंट Weibo सुद्धा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. कम्युनिस्ट सरकारच्या नियमांनुसार चीनमध्ये फेसबुक किंवा ट्विटरचा वापर होत नाही. त्यांचे स्वत:चे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत. एवढच नव्ह तर लेखिकेची मुलाखत सुद्धा Caijing  वरून हटवण्यात आली. (हे वाचा-'भारतात जन्म ही माझी चूक', ट्रम्प यांच्या इमिग्रेशनच्या घोषणेवर भारतीय नाराज) Radio France Internationale मधील बातमीनुसार लेखिकेला धमकवणाऱ्या एका निनावी चिनी नागरिकाने, वुहान शहराच्या मध्यभागी एक पोस्टर लावलं होतं. ज्यामध्ये फांग यांचा फोटो लावण्यात आला होता आणि लिहीलं होतं की, 'चीनला बदनाम केल्यामुळे या लेखिकेने एकतर सन्यास घ्यावा किंवा आत्महत्या करावी. असं न केल्यास मी स्वत: तिचा खून करेन.' चीनमध्ये उमटलेल्या प्रतिक्रियांवरून अनेकांचं म्हणणं असं आहे की, लेखिकेच्या लिखाणामुळे वुहानची काळी बाजू जगासमोर येईल. इंग्रजी आणि जर्मन भाषेत प्रसिद्ध होणार डायरी इंग्रजी भाषेतील या डायरीवरील पुस्तक 30 जूनपर्यंत येण्याची शक्यता आहे. 'Dispatches from a quarantined city: Wuhan Diary' असं या पुस्तकाचं शीर्षक असणार आहे. या पुस्तकाचं जर्मन भाषेचं मुखपृष्ठ वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. ज्यामध्ये काळा मास्क बनवण्यात आला आहे तर त्याचं शीर्षक Wuhan Diary: The forbidden diary from the city where the corona crisis began असं असणार आहे. लेखिकेला धमक्या यायला लागल्यानंतर जर्मन प्रकाशक Hoffmann und Campe यांनी त्यांचं वादग्रस्त मुखपृष्ठ मागे घेतलं आहे. ही पहिली घटना नाही आहे की चीनमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. याआधीही बऱ्याच घटना चीनमध्ये घडल्या  आहेत. संपादन - जान्हवी भाटकर
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: China, Wuhan

  पुढील बातम्या