Home /News /videsh /

'भारतात जन्म ही माझी चूक', ट्रम्प यांच्या इमिग्रेशनविषयीच्या घोषणेवर भारतीयानं व्यक्त केली व्यथा

'भारतात जन्म ही माझी चूक', ट्रम्प यांच्या इमिग्रेशनविषयीच्या घोषणेवर भारतीयानं व्यक्त केली व्यथा

कोरोनाचा वाढता प्रसार पाहता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातील इमिग्रेशन प्रक्रिया पुढील दोन महिन्यांसाठी स्थगित केली आहे.

    न्यूयॉर्क, 23 एप्रिल : कोरोनामुळे सध्या अमेरिकेत हाहाकार माजला आहे. कोरोनामुळे अमेरिकेत 8 लाख 52 हजार 703 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 47 हजार 750 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातील इमिग्रेशन प्रक्रिया पुढील दोन महिन्यांसाठी स्थगित केली आहे. दरम्यान, या घोषणेचा एच 1 बी व्हिसावर परिणाम होणार नाही. मात्र ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर अनेकांचे आयुष्य बदलणार आहे. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे अनेक भारतीय वंशाचे लोक निराश आणि संतप्त असल्याचे अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तात समोर आले आहे. 39 वर्षीय प्रियंका नागर यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले की, 'मी सरकारला विनंती करते की आपण आम्हाला शत्रूसारखे पाहू नये. व्यवसायाने सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या नागर यांनी, मला कायमच अमेरिकन व्हायचे आहे. या देशाने आम्हाला बरेच काही दिले आहे, असेही सांगितले. वाचा-निरोगी रुग्णांमध्ये 70 दिवसांनी दिसली वेगळीच लक्षणं, वैज्ञानिकांची चिंता वाढली 'माझा जन्म भारतात झाला, ही चूक' नागर यांनी सांगितले की, "अमेरिकेत सध्या सर्व लोकं एकत्र या संकटाशी सामना करत आहे. अशी विविधता तुम्हाला कुठेच मिळणार नाही". तर, 2011मध्ये ग्रीन कार्डसाठी अर्ज करणारे इलेक्ट्रीक अभियंता सोमक गोस्वामी म्हणाले की, "हा कायदा बदलल्याशिवाय मला या जीवनात ग्रीन कार्ड मिळू शकणार नाही. 2017मध्ये अमेरिकेत आलेल्या माझ्याबरोबर काम करणाऱ्या बर्‍याच लोकांना ग्रीन कार्ड मिळाले. माझा दोष हा आहे की माझा जन्म भारतात झाला". दरम्यान ट्रम्प यांनी अनिश्चित काळासाठी अमेरिकेत कोणत्याही देशातील नागरिकांना येण्यास बंदी घातली आहे. वाचा-खरं आहे की खोटं : 3 मेपर्यंत टेलिकॉम कंपनी इंटरनेट फ्री देणार? ट्रम्प यांनी विशेष आदेशांवर केल्या स्वाक्षरी ट्रम्प यांनी परदेशी नागरिकांवर बंदी घालून स्थानिक रहिवाशांच्या नोकर्‍या वाचवण्याचा दावा केला आहे. ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की कोरोनाशी लढा देण्यासाठी आणि नोकरी वाचवण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे थांबवण्यासाठी काय धोरण असेल किंवा हे किती काळ लागू केले गेले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार हे तात्पुरते आहे आणि परिस्थिती सुधारताच माघार घेतली जाईल. या आदेशाचा क्रॉस बॉर्डर ऑपरेशनवर काय परिणाम होणार आहे याबात अद्याप व्हाईट हाऊसने स्पष्ट केले नाही. संपादन, संकलन-प्रियांका गावडे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या